आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारच्या एका आदेशामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मयिलादुथुराई जिल्हा प्रशासनाने धर्मपुरम अधीनम मठाच्या स्वामींना पालखीतून नेण्याची प्रथा रोखली आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्था तसेच मानवी हक्क उल्लंघनाचे कारण दिले आहे. मात्र, मठाने या निर्णयाला विरोध करत आदेश राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
धर्मपुरम अधीनम शैव मठवासी संस्था आहे. त्याचे २७ वे प्रमुख मासिलामणी देसिका ज्ञानसंबंध परमचार्य स्वामीगल यांना २२ रोजी ‘पट्टिना प्रवेशम' मध्ये सहभागी व्हायचे होते. यात भक्त अधीनम प्रमुखांना पालखीत बसून नेले जाते. यासोबत शेकडो भक्त चालतात. मदुराई अधीनम मठाचे २९३ वे धर्मगुरू श्री घनसमंथा देसिक परमाचार्य स्वामीगल म्हणाले, ही बंदी राज्यपालांच्या दौऱ्यानंतर २७ एप्रिल रोजी घालण्यात आली आहे. ‘पट्टिना प्रवेशम' कोणत्याही स्थितीत होईल. यासाठी आम्ही प्राणार्पणासही तयार आहोत. स्वामीगल यांनी सरकारला आव्हान देत सांगितले की, शेकडो वर्षांच्या परंपरेशी तडजोड केली जाणार नाही. मी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना परवानगी देण्याची विनंती करतो. तसे न झाल्यास मी पालख्यांसाेबत चालेन.
मयिलादुथुराईचे आरडीओ बालाजी यांनी दैनिक भास्करला सांगितले की, कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही. काही समूह विरोध करत आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. याआधी २० एप्रिल रोजी मठाला भेट देणारे राज्यपाल आरएन रवी यांना व्हीसीके, सीपीआय, सीपीएम, डीव्हीके, एसडीडीआय, द्रविड कळघम यासारख्या पक्षांनी विरोध केला. त्यांनी अधीनमच्या ‘ज्ञान रथ यात्रेस' राज्यपालांकडून हिरवी झेंडी दाखवण्यावरही आक्षेप घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.