आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Spokesperson Nupur Sharma Suspended From Party For 6 Years; Media Head Navin Jindal Badfar

पैगंबरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी:भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित; माध्यमप्रमुख नवीन जिंदल बडतर्फ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोहंमद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने रविवारी पक्ष प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना निलंबित केले. दिल्ली प्रदेश भाजपचे मीडियाप्रमुख नवीनकुमार जिंदल यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढण्यात आले आहे. दरम्यान, नूपुर शर्मा यांनी आपले वक्तव्य बिनशर्त मागे घेत असल्याचे म्हटले आहे.

भाजपने सांगितले की, पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या वक्तव्याविरुद्ध आहे. भाजप शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी नूपुर शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, त्यांनी जे काही सांगितले ते पक्षाच्या घटनेविरुद्ध आहे. चौकशी होईपर्यंत आपणास पक्षातून निलंबित केले जात आहे. दरम्यान, नूपुर शर्मा यांनी या कारवाईनंतर दिलगिरी व्यक्त केली. आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेते. यात माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा शर्मा यांनी सोशल मीडियावर केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल नूपुर शर्मा यांच्याविरुद्ध मुंबई, हैदराबाद आणि पुण्यात तक्रारींनंतर गुन्हे दाखल झाले.

दिल्ली भाजपचे मीडियाप्रमुख नवीन जिंदल यांचेही निलंबन
दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी नवीन जिंदल यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले की, सोशल मीडियावरील तुमची टिप्पणी धार्मिक सलोखा आणि पक्षाच्या विचारधारेचे उल्लंघन आहे. तुम्हाला पक्षातून बडतर्फ केले जात आहे. भाजप सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले, भाजप सर्वधर्म समभावाचे तत्त्व मानणारा पक्ष आहे. कोणत्याही धर्माचा किंवा पूज्य व्यक्तींचा अवमान भाजप मान्य करत नाही. कोणत्याही धार्मिक भावनेला ठेच पोहोचवणारे विचार पक्षाला मान्य नाहीत.

बातम्या आणखी आहेत...