आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Starts Preparations For Assembly Elections, New Responsibility Assigned To Devendra Fadnavis

मोठी जबाबदारी:विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने सुरू केली तयारी, देवेंद्र फडणवीसांवर सोपवली नवी जबाबदारी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या वर्षभरामध्ये देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्राने नवीन जबाबदारी सोपवली आहे. गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये वेगळी जबाबदारी दिली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणार अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. आता भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

येत्या वर्षभरामध्ये देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने आता तयारी सुरू केली आहे. मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांच्या काळात या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपात फेरबदल केले आहेत.

फडणवीसांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेतृत्त्व करणारे देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजपच्या वरिष्ठांनी गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीसांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांनी चांगली कामगिरी केली आहे. 2020 झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 70 पेक्षा जास्त जागा जिंकत संयुक्त जनता दलासह सत्ता कायम ठेवली. यानंतर आता फडणवीस गोव्यातील निवडणुकांमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...