आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Suspended MLA T. Raja Arrested For Second Time In Case Of Controversial Statement On Prophet

पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य:BJPचे निलंबित आमदार टी. राजा यांना दुसऱ्यांदा अटक, दोन दिवसांपूर्वीच मिळाला होता जामीन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हैदराबाद पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी. राजा सिंह यांना त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून पुन्हा अटक केली आहे. राजा यांच्या विधानानंतर 23 ऑगस्ट रोजी प्रचंड निदर्शने झाली होती.

दोन दिवसांपूर्वी मिळाला होता जामीन

यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार टी. राजा सिंह यांना जामीन मिळाला होता. न्यायालयाने याआधी भाजप नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र नंतर कोठडीचा आदेश मागे घेत त्यांना जामीन मंजूर केला. पोलिसांनी टी. राजा सिंह यांना हैदराबाद येथील नामपल्ली न्यायालयात हजर केले.

भाजपने राजा सिंह यांना निलंबित केले

टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्याच्यावर भादंविच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आधी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र नंतर न्यायालयाने कोठडीचा आदेश मागे घेत जामीन मंजूर केला.

कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरोधात व्हिडिओ

मंगळवारी, 23 ऑगस्ट रोजी टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या व्हिडिओमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांनी याला विनोद म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

राजा यांच्या वक्तव्याविरोधात सोमवारी रात्रीपासून हैदराबादमध्ये निदर्शने करण्यात आली. संतप्त जमावाने गोशामहल येथून आमदार टी. राजा यांच्या अटकेची मागणी केली होती आणि 'गुस्ताखे नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा' अशा घोषणा दिल्या.

राजा सिंह यांच्या वकिलाला मिळाली होती धमकी

टी. राजा सिंह यांच्या वकिलाला UAE मधून धमक्या आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वकिलाला धमकीचे 3 फोन आले आहेत. राजा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण हैदराबादमध्ये निदर्शने सुरू आहेत. मंगळवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली, मात्र रात्रीपर्यंत जामीन मिळाला. याविरोधात रात्रभर झालेल्या निदर्शनांमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकासह चार जण जखमी झाले होते.

ओवैसींचा आरोप- भाजपला दंगल घडवायची आहे

राजा सिंह यांच्या कथित वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'मी भाजप आमदाराच्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपला तेलंगणा आणि हैदराबादची शांतता बिघडवायची आहे आणि इथे जातीय दंगली घडवायची आहे.

बातम्या आणखी आहेत...