आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींवर भाजपची टीका:काँग्रेस नेते राहुल गांधीं नेपाळमधील नाइट क्लबमध्ये मजा करत असल्याचा भाजपचा दावा

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा नेपाळमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात राहुल एका पबमध्ये आयोजित पार्टीत दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने राहुल गांधींवर प्रहार केला आहे. भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल काठमांडूच्या नाइट क्लबमध्ये मजा करत असल्याचा दावा केला आहे.

भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या पक्षात गोंधळाची स्थिती असताना ते अशावेळी नाइट क्लब पार्टी करत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही व्हिडीओ शेअर करत, ‘व्हॅकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजीट देशासाठी नवी गोष्ट नाही’ असे वक्तव्य केले. तर भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, जोधपुरमध्ये हिंसाचार होत आहे. राजस्थानात काँग्रेसची सत्ता आहे, राजस्थान जळतो आहे. अशा गोष्टींवर चिंता करण्यापेक्षा राहुल पार्टी करताना दिसत आहेत. काँग्रेस म्हणली, राहुल न बोलावता पाकिस्तानला गेले नव्हते. काँग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी वरील मुद्दा खोडून काढताना म्हटले, राहुल गांधी काठमांडूत आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेले होते.

बातम्या आणखी आहेत...