आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिस्सार:टिकटॉक स्टार सोनाली फोगाटची पोलिसादेखत कर्मचाऱ्यास चपलेने मारहाण

हिस्सार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनाली फोगाटने 2019 मध्ये आदमपूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवली होती

भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवलेली टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिने हिस्सार जिल्ह्यातील बालसमंद येथील बाजार समितीच्या सचिवास चपलेने मारहाण केली. विशेष म्हणजे तिने पोलिसादेखत त्यांना बदडल्याची घटना घडली. 

फाेगाट शेतकऱ्यांसाठी एक शेड उभारण्यासाठी  बाजार समिती कार्यालयात गेली होती.  त्यावरुन वाद झाला. सोनालीने बाजार समितीचे सचिव सुल्तानसिंह याच्याकडून खुलासा मागितला असता, त्यांनी सोनालीस तिच्या टिकटॉक व्हिडिओवरुन काही टिप्पणी केली. व काही अपशब्द उच्चारले. यावर संतप्त झालेल्या फोगाटने सुल्तानसिंह यास थप्पड मारल्या. फोगाट संबंधित अधिकाऱ्यास शिवीगाळ करतानाही व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान तुला जितके मारेन तेवढेही कमीच आहे. तुला माफी नाही. महिलेशी वाईट वर्तन, अश्लील बोलणे कोणी शिकवले? असा जाब विचारतानाही दिसते आहे. दरम्यान, उकलानाचे माजी आमदार नरेश सेलवाल यांनी सोनाली विरोधात सरकारी कार्यालीयात अडथळे आणणे व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सेलवान यांनी पोलिस हवालदारावरही कारवाईची मागणी केली आहे. टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिने २०१९ मध्ये आदमपूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे कुलदीप विश्नोई यांनी तिला पराभूत केले होते.

0