आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP To Field 100 New Faces For Gujarat Assembly Polls R. Indications Given By Patil

निवडणूक:गुजरातमध्ये विधानसभेसाठी भाजप देणार 100 नवे चेहरे, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिले संकेत

गांधीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत १०० नवे उमेदवार देण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिले. हिंमतनगरात ते म्हणाले, सध्या ज्या ७० जागा भाजपकडे नाहीत त्या आणि इतर जागा मिळून आगामी निवडणुकीत १०० नवे चेहरे असतीलच.

आ. राजेंद्रसिंह चावडा यांच्याकडे इशारा करत पाटील म्हणाले की, चावडांचे आणि खासदार म्हणून माझेही तिकीट पक्के नाही. पाटील यांचे हे वक्तव्य मिशन २०२२ मध्ये भाजपद्वारे मोठ्या प्रमाणावर ‘नो रिपीट थेअरी’चा अवलंब केला जाण्याचे संकेत मानले जात आहे. पाटील म्हणाले, ‘ज्यांनी चांगले काम केले, त्यांचे काम लोक पाहत आहेत. कार्यकर्त्यांनी तर तिकीट मागितलेच पाहिजे. ज्या आमदारांचे काम चांगले नाही, ज्यांच्याविरुद्ध तक्रारी असतील त्यांना तिकीट मिळणार नाही. जे मागील निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांना मी निमंत्रित सदस्य म्हणून पक्षात सक्रिय केले आहे. तिकिटाची मागणी घेऊन माझ्याकडे येऊ नका, थेट वर जा. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे. कोणत्या भागात कोण लोकप्रिय आहे, हे जाणून घेण्यासाठी ते ५-६ प्रकारची सर्वेक्षणे करवून घेतात. त्याच्या आधारावरच तिकिटाचा निर्णय होतो.’

बातम्या आणखी आहेत...