आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:भाजप देशभर निदर्शने करणार; ममता बॅनर्जींचा आज शपथविधी

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतरही हिंसाचार सुरूच

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी बुधवारी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात भाजप देशभरात धरणे-निदर्शने करणार आहे. हिंसाचारात सहा कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा भाजपने तर पाच कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने मंगळवारी केला. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा मंगळवारी कोलकात्यास पोहोचले. त्यांनी पीडित कार्यकर्त्यांची भेट घेतली. हिंसाचाराच्या अशा घटना भारतात फाळणीनंतर झाल्या होत्या, अशी प्रतिक्रिया नड्डांनी दिली. पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी त्यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी फोनवरून संभाषण केले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन राज्यपालांनी ममतांना केले. भाजपचे प्रवक्ता गौरव भाटिया यांनी हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलिसांनी हिंसाचार रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवण्यात यावा, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, तृणमूलचे गुंड कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांसमवेत संपूर्ण ताकदीने उभा आहे. आम्ही राजकारण सोडलेले नाही. दोन मे रोजी निकाल जाहीर झाले. त्यात तृणमूलला २१३ व भाजपला ७७ जागा मिळाल्या. तेव्हापासून हिंसाचार सुरू आहे.

‘पीएमनी स्टंट बंद करावा’
तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, राज्यातील जनतेने भाजपला नाकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना फोन करत आहेत. ते राज्यातील जनतेच्या आदेशाचे पालन करत नाहीत, हे स्पष्ट झाले. पंतप्रधानांनी स्टंट बंद करावेत. कोरोनाशी मुकाबल्यासाठी काम करावे, असे खासदार ब्रायन यांनी म्हटले आहे.

हिंसाचाराबाबत राज्यपाल धनखड म्हणाले, पंतप्रधानांनी फोन केला व कायदा-सुव्यवस्था बिघडत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. नियंत्रण खूप गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सोशल मीडियातून म्हटले आहे. घडामोडी अतिशय भयंकर आहेत. लोकांत घबराट पसरली आहे. ते जीव मुठीत घेऊन धावपळ करत आहेत. हल्लेखोर विनाशाचे तांडव करत आहेत. राज्यपालांची सोशल मीडियावर प्रतिक्रिया- राज्यात भयावह परिस्थिती, जीव मुठीत घेऊन लोकांची धावपळ

हिंसाचाराचे प्रकरण सुप्रीम कोर्टात, याचिका दाखल
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी याबाबत अर्ज दाखल केला आहे. घटनांची सीबीआय चाैकशीची विनंती त्यांनी केली.

निवडणूक अधिकाऱ्यास सुरक्षा द्यावी : आयोग
निवडणूक अधिकारी व उपजिल्हाधिकारी किशोर विश्वास यांना सुरक्षा देण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने राज्याला आदेश दिले आहेत. ममता दोन हजारांहून कमी मतांनी पराभूत झाल्या. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकालात घोटाळा केल्याचा आरोप ममतांनी केला. त्यानंतर आयोगाने आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...