आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने काश्मिरी पंडितांचा व्होट बँकेप्रमाणे वापर केल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. अब्दुल्ला म्हणाले, काश्मीरच्या लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शनिवारी पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर केले. यामध्ये काश्मिरी पंडितांना खोऱ्यात जोडण्याचा प्रस्तावही आहे. फारूक यांच्या उपस्थितीत मंजूर झालेल्या प्रस्तावांमध्ये काश्मिरी पंडितांसाठी मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनासाठी कायदा करण्याची मागणी आहे. फारुख म्हणाले, काश्मिरी पंडित तीन दशकांपासून सन्मानपूर्वक पुनरागमन आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा करत आहेत. काही शक्तींना वाटते की, पंडितांना पळवून लावून काश्मीरवर कब्जा करू.
फारूक अब्दुल्लांनी १९९० च्या घटनेसाठी मागितली माफी
भाजपवर हल्ला करताना फारूक म्हणाले, काही शक्तींनी काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांना विभागण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजही नोकरी आणि अन्य क्षेत्रांत आपल्या हिस्सेदारीचा लायक आहे. मात्र, त्यांनी कधी पंडितांचा हक्क हिरावला नाही. ९० च्या दशकापासून पंडितांच्या सुरक्षेसाठी काहीही करू न शकल्याने मी त्यांची माफी मागतो. मी द्वेषापासून दूर राहण्याचे आणि प्रेम पसरवण्याचे आवाहन करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.