आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Vs Arvind Kejriwal On Kashmiri Pandits । BJYM Condemns Statement On Kashmiri Pandits, Saffron Painted On Kejriwal's House Gate, Sisodia Says BJP Wants To Assassinate Him

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला:काश्मिरी पंडितांवरील वक्तव्याचा BJYM कडून निषेध, गेटवर लावला भगवा रंग, सिसोदिया म्हणाले - भाजपला त्यांची हत्या करायची आहे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराजवळ निदर्शने करणाऱ्या लोकांनी बुधवारी तोडफोड केली. बुधवारी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या सुमारे 150-200 आंदोलकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे घर असलेल्या आयपी कॉलेजजवळील लिंक रोड येथे निदर्शने सुरू केली. केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांवर भाष्य केले होते. यावर माफी मागावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले.

दुपारी 1 च्या सुमारास काही आंदोलक दोन बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आंदोलकांनी त्यांच्यासोबत भगव्या रंगाचा एक छोटा बॉक्स घेतला होता. हा रंग त्यांनी मुख्य गेटवर लावला. या गोंधळात एक बूम बॅरिअर तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तुटला.

पोलीस पथकाने त्यांना तत्काळ घटनास्थळावरून हटवले आणि सुमारे 70 जणांना ताब्यात घेतले. आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

केजरीवाल यांच्या घराबाहेर गोंधळ घालताना BJMY आंदोलक.
केजरीवाल यांच्या घराबाहेर गोंधळ घालताना BJMY आंदोलक.

उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केले ट्विट

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. सिसोदिया म्हणाले, "दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून असामाजिक तत्त्वांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे तोडले आहेत. गेटवरील बूम बॅरिअर्सही तुटले आहेत. पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणाले- 'भाजपचे गुंड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड करत आहेत. भाजपच्या पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी घराच्या दारापर्यंत आणले."

सिसोदिया म्हणाले- केजरीवाल यांना संपवायचे आहे भाजपला

त्यानंतर पत्रकार परिषदेत सिसोदिया यांनी पोलिसांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप केला. सुनियोजित कटाचा भाग म्हणून केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. पंजाबला निवडणुकीत पराभूत करता आले नाही, तर भाजपला आता केजरीवाल यांना संपवायचे आहे. त्यांना मारायचे आहे.

गौतम गंभीर यांचा टोमणा

सिसोदिया यांच्या आरोपावर दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर यांनी टोमणा मारत ट्विट केले की, काश्मिरी हिंदूंचा अपमान करून मी वाईटरीत्या अडकलो आहे. लाखो प्रयत्न आणि विकाऊ इंटरव्ह्यूच्या नंतरही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आता यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, व्हिक्टिम कार्ड. भाजपला मला मारायचे आहे. कृपया हे पसरविण्यात मदत करा, तुमचा प्रचार मंत्री."

बातम्या आणखी आहेत...