आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. शुक्रवारी त्यांनी भाजप आणि आरएसएसला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला देत जय श्री राम आणि जय सियाराममधील फरक सांगितला. तसेच भाजपच्या संघात महिला शाखा नाही, असाही दावा राहुल यांनी केला होता. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राहुल यांना आरएसएसचे पूर्ण ज्ञान नाही, असे म्हटले. तसेच संघात संघात दुर्गा वाहिनी असल्याचे त्यांनी सांगितले.
बोम्मई म्हणाले की, त्यांना आरएसएस पूर्णपणे माहीत नाही. त्याची दुर्गा वहिनी नावाची महिला शाखा आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही 'भारत माता की जय' या घोषणेने करतो.
राहुल काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळवा येथे होती. यावेळी आगर येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. आरएसएस आणि भाजपचे लोक प्रभू रामाच्या जीवनपद्धतीवर चालत नाहीत. भाजपवाले सियाराम आणि सीताराम म्हणू शकत नाहीत. कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही. त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही, कारण सीतेला त्यांनी हाकलून दिले आहे, असे राहुल यांनी म्हटले.
भाजपच्या नेत्यांचे प्रत्युत्तर
'जय श्रीराम' नाही, 'जय सियाराम' म्हणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. शुक्रवारी त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला दिला होता. तसेच जय श्रीराम व जय सियाराममधील फरकही स्पष्ट करून सांगितला होता. आता भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार केला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राजस्थानमध्ये 'भारत जोडो यात्रा'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो यात्रेने' तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण केला असून आता राजस्थानमध्ये यात्रा पोहचली आहे. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस आहे. सोमवारी सकाळी 6.11 च्या सुमारास झालावाड येथील काली तलाई येथून यात्रेला सुरुवात झाली. काझी तलाई ते बळी बोर्डा असा सुमारे 14 किलोमीटरचा प्रवास करून यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.