आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP West Bengal 148 Candidate List Update | West Bengal Election 2021 Latest News And Udpate

बंगाल विधानसभा निवडणूक:भाजपकडून 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या पहिल्या यादीत एकाही मुस्लिम उमेदवाराचे नाव नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. गुरुवारी आलेल्या लिस्टमध्ये मुकुल रॉय, राहुल सिन्हा आणि खासदार जगन्नाथ सरकार यांच्या नावाचा समावेस आहे.

दरम्यान, लोकप्रिय मालिका 'रामायण'मध्ये भगवान श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांना दिल्लीमध्ये पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.

पहिल्या लिस्टमध्ये 57 उमेदवार

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 57 उमेदवारांची नावे होती. यात सर्वात मोठे नाव शुभेंदु अधिकारी यांचे होते. त्यांना ममता बॅनर्जींविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या या 57 नावांमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराचे नाव नव्हते. यावरुन असे म्हटले जात आहे की, भाजप या निवडणुीत फक्त हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नात आहे. यादीत 12 SC, 7 ST उमेदवार आहेत.

बातम्या आणखी आहेत...