आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. भाजपने मेघालयाच्या सर्वच ६० जागांवर एकटेच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा आणि मेघालय क्षेत्राचे अध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. नागालँडमध्ये पार्टी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी)सोबत युतीत निवडणूक लढवणार आहे. ६० सदस्यीय नागालँडमध्ये एनडीपीपीला ४० आणि भाजपला २० जागा मिळाल्या. राज्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी आहे. पक्षाचे नागालँडमधील प्रभारी नलिन कोहली यांनी सांगितले, भाजप विद्यमान ११ आमदारांना पुन्हा तिकीट देणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.