आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने दक्षिणेतील एकमेव बालेकिल्ला कर्नाटकात मोठा डाव लावला आहे. ज्याप्रमाणे आंध्रात एन. टी. रामाराव आणि तामिळनाडूत एम. जी. रामचंद्रन यांना आयकॉनचा दर्जा आहे त्याप्रमाणे भाजप येथे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांना राजकीय प्रस्थापित करू पाहतेय. शिमोगा एअरपोर्ट रस्त्याला बीएस येदियुरप्पा मार्ग नाव देण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार शाळांमध्ये येदियुरप्पांचे चरित्रही शिकवले जाईल. त्यांचा मतदारसंघ शिकारीपुरा आणि विधानसभेत त्यांचे चित्र लावणे, त्यांच्या नावावर ग्रंथालय, शेतकरी योजना, रुग्णालयांना नाव देण्याची तयारी केली जात आहे.
कारण : येदियुरप्पा सर्वात प्रभावी राजकीय नेते भाजपचा दावा आहे की, कर्नाटकमध्ये विरोधी पक्षाचे नेतेही येदियुरप्पांचा आदर करतात. त्यांना चेहरा बनवण्याचा उद्देश कर्नाटकातील पुढील निवडणुकीसह भविष्यात मिशन साऊथ राबवणे हा आहे. दक्षिणेत भाजप उत्तर भारतीय पक्ष असल्याची आपली प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करत आहे.
निवडणुकीची धुरा सोपवली भाजपने अनौपचारिकपणे निवडणुकीची धुरा येदियुरप्पांकडे दिली आहे. भाजपमध्ये कदाचित पहिल्यांदाच एखाद्या संसदीय बोर्डाचे सदस्य नसलेल्या येदियुरप्पांनी आपल्या जोरावर जाहीर केले की विद्यमान आमदारांना सोडून सर्वांना तिकीट मिळेल. पक्षानेही त्यांना मोकळीक दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.