आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने रचला इतिहास:​​​​​​​राज्यसभेत सर्वाधिक 100 सदस्य असणारा बनला पक्ष, 1990 नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला एवढ्या जास्त मिळाल्या जागा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सलग दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त करणारा भाजप आता 1990 नंतर प्रथमच राज्यसभेच्या 100 जागा प्राप्त करणारा पक्ष ठरला आहे. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत आसाम, त्रिपुरा व नागालँडमधील प्रत्येकी एका जागेवर भाजपचा विजय झाला. यामुळे भाजपला राज्यसभेत प्रथमच शतक मारता आले. भाजपच्या रुपात एखाद्या पक्षाने तब्बल 32 वर्षांनंतर राज्यसभेतील 100 जागा जिंकण्याचा विक्रम केला आहे.

6 राज्यांतील राज्यसभेच्या 13 जागांसाठी नुकतीच द्वैवार्षिक निवडणूक झाली. यात आसाममधील 2, हिमाचल प्रदेशातील 1, केरळातील 3, नागालँडमधील 1, त्रिपुरातील 1 व पंजाबमधील 5 जागांचा समावेश होता. भाजपने पंजाबमधील आपली 1 जागा गमावली. पण, ईशान्येतील तिन्ही राज्य व हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी एक जागा त्याला जिंकण्यात यश आले.

अधिकृत घोषणा अद्याप बाकी

राज्यसभेच्या संकेतस्थळाने अद्याप नव्या टॅलीची अधिसूचना जारी केली नाही. सद्यस्थितीत भाजपच्या सदस्यांची संख्या 97 आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याचा 3 जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील त्याचे संख्याबळ 100 वर पोहोचले आहे.

2014 मध्ये होत्या 55 जागा

245 सदस्यीय राज्यसभेत 123 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. भाजप या आकड्याकडे हळुहळू मार्गक्रमण करत आहे. 2014 मध्ये राज्यसभेत भाजपच्या 55 जागा होत्या. त्यानंतर पक्षाने विविध राज्यांत सत्ता हस्तगत केल्यामुळे त्यात सातत्याने भर पडत आहे.

1988 साली काँग्रेसची राज्यसभेतील सदस्य संख्या 100 च्या वर होती.
1988 साली काँग्रेसची राज्यसभेतील सदस्य संख्या 100 च्या वर होती.

1988 मध्ये राज्यसभेत होता काँग्रेसचा दबदबा

1988 साली राज्यसभेत काँग्रेसचे 108 सदस्य होते. त्यानंतर 1990 मध्ये झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत हा आकडा 99 पर्यंत घसरला. त्यानंतर काँग्रेसचे या सभागृहातील संख्याबळ सातत्याने आटत चालले आहे.

भाजपची पकड होऊ शकते सैल

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आदी राज्यांतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपची या सभागृहावरील पकड लवकरच सैल होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये 'आप'चा डंका

पंजाबमधील राज्यसभेच्या पाचही जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात दिल्लीच्या राजिंदर नगरचे आमदार राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, संदिप पाठक, संजिव अरोडा व अशोक मित्तल यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...