आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Worker Murdered In Katihar, Shots Were Fired In The Head And Face In Front Of The House, Latest News And Update  

कटिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या:सकाळी घराबाहेर पडताच मिश्रा यांच्यावर मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या; लोकांनी केला रास्ता रोको

कटिहार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटिहारमध्ये भाजप नेते संजीव मिश्रा यांची अज्ञातांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मारेकऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलेले होते. सकाळी संजीव मिश्रा घरातून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना बलरामपूरच्या तेलता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेलता हायस्कूलजवळ घडली आहे. गोळीबार करून हल्लेखोर तेथून पळून गेले.

हत्येनंतर लोक रस्त्यावर उतरले.
हत्येनंतर लोक रस्त्यावर उतरले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरले. पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. लोकांनी बांबूच्या काठ्या घेऊन रस्ता अडवला. 10 महिन्यांपूर्वीही माजी जिल्हा परिषद सदस्य संजीव मिश्रा यांच्यावर अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. गोळ्यांचा आवाज ऐकूण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गंभीर अवस्थेत पूर्णिया मॅक्स रुग्णालयात दाखल केले. अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. गोळीबार करणारे मुक्तपणे फिरत आहेत.

यात संजीव मिश्राचा जागीच मृत्यू झाला.
यात संजीव मिश्राचा जागीच मृत्यू झाला.

संजीव मिश्रा बंगालच्या सीमेवर भाजपचा बुलंद आवाज

बिहार-बंगालच्या सीमेवर वसलेल्या दुर्गम भागात संजीव मिश्रा गेल्या काही वर्षींपासून भाजपचे काम करतात. यापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी घरासमोर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. संजीव मिश्रा हे कटिहार विधानपरिषदचे आमदार अशोक अग्रवाल यांचे निकटवर्तीय मानले जात असत. प्राथमिक स्तरावर हे प्रकरण परस्पर वैमनस्यातून असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला.

बातम्या आणखी आहेत...