आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बागपतच्या मशीदीमध्ये वाद:भाजप कार्यकर्त्याने मशीदीमध्ये हनुमान चालिसाचे केले पठण, सोशल मीडियावर केले LIVE

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 29 अक्टोबरला मथुराच्या नंदबाबा मंदिरात 2 मुस्लिमांनी नमाज पठण केले होते.

मथुरामध्ये पहिल मंदिरात नमाज आणि नंतर मशीदीत हनुमान चालिसा पठण करण्यात आले. आता उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्येही असे प्रकरण समोर आले आहे. यावेळी भाजप कार्यकर्ता मनुपाल बन्सल यांनी विनयपूरच्या मशीदीमध्ये हनुमान चालिसा पठण केले. असे बोलले जात आहे की, बन्सल यांनी मौलाना अली हसन यांच्या संमतीनेच मशीदीमध्ये पठण केले होते. हे प्रकरण मंगळवारचे आहे. बन्सल यांनी सोशल मीडियावर LIVE टेलीकास्ट केला होता.

बंसल यांनी म्हटले - मौलाना यांनी बंधुतेचा संदेश दिला
मुस्लिम समाजाने मौलाना अली हसन यांना मशीदीतून काढून टाकले आहे. बुधवारी गुप्त पध्दतीने झालेल्या मुस्लिम समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यानंतर मौलाना गाजियाबादच्या लोनी येथे निघून गेले आहेत. तिकडे बन्सल म्हणाले आहेत की, मौलाना यांना काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी तर बंधुतेचा संदेश दिला होता.

मौलानानेही बंसल यांच्याविरोधात कारवाई करण्यास नकार दिला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात मौलाना म्हणाले की, बन्सल गावात राहणारेच आहेत आणि परिचित आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करायची इच्छा नाही.

मंदिर-मशीदीत 7 दिवसात तिसरा वाद
29 अक्टोबरला मथुराच्या नंदबाबा मंदिरात 2 मुस्लिमांनी नमाज पठण केले होते. पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली. मंदिराला गंगाजलने धुण्यात आले. या घटनेनंतर मथुरामध्येच बरसाना रोडवरील मशीदीमध्ये 4 तरुणांनी हनुमान चालिसा पठण केले होते. चौघांना अटक करण्यात आली होती.