आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील BJP कार्यकर्त्यांना 3 दिवसांची सुट्टी:होणार नाहीत कोणतेही मोठे कार्यक्रम, विरोधकांचा निवडणूक रणनिती असल्याचा दावा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांना 2 ते 5 मेपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनुसार, राज्यातील जवळपास 1 कोटी कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. त्यांच्या मते, भाजपचे कार्यकर्ते केव्हाच सुट्टी घेत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणतेही मोठे कार्यक्रम होणार नाहीत

भाजपने कार्यकर्त्यांना सुट्टी देण्यासह या 3 दिवसांत कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आदेश दिलेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागील 2 वर्षांपासून अथक काम केले आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

प्रथमच निर्णय

यासंबंधीच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये प्रथमच असा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांवर कोणतीही सक्ती केली नाही. ​​​​​​​

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भरुचमध्ये केला होता विजयाचा दावा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भरुचमध्ये केला होता विजयाचा दावा.

लवकर होऊ शकते निवडणूक

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी गुजरातच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा भरुचमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपचा राज्यात लवकरात लवकर निवडणूक घेण्याचा मानस असल्याचा दावा केला होता. या ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणूक होऊ शकते.

विविध पक्षांचे विजयाचे दावे

केजरीवाल म्हणाले होते -निवडणूक आता होवो किंवा 6 महिन्यांनी देव व गुजरातची जनता आमच्यासोबत असल्यामुळे येथे आमचा विजय निश्चित आहे. दुसरीकडे, भाजपनेही विरोधकांना कडवी टक्कर देण्याचा दावा केला आहे.

भाजपला मोठ्या विजयाचा विश्वास

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाला आगामी निवडणुकीत केवळ विजयाचाच विश्वास नाही, तर 2017 च्या तुलनेत अधिक जागा जिंकण्याचाही विश्वास आहे. गुजरातमध्ये 15 जूनपासून मान्सून धडकेल. त्यामुळे लवकर निवडणूक घेण्याची कोणतीही शक्यता नाही. निवडणुकीसाठी जवळपास 45 दिवसांचा कालावधी हवा असतो.

बातम्या आणखी आहेत...