आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, फडणवीस म्हणाले - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण चालू

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व तथाकथित पुरोगामी आणि स्व:तला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार आता चूप का आहेत, फडणवीसांचा सवाल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. नागपुरातील महाल भागातील भाजपा कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आदींच्या नेतृत्वात या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात प्रत्येक मंडलात, शहरातील प्रत्येक वार्डात, प्रत्येक बुथवर निदर्शने करण्यात आली. जिल्हा भाजपाध्यक्ष अरविंद गजभिये, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, सर्वश्री आमदार टेकचंद सावरकर, गिरीश व्यास, प्रभारी माजी आमदार अनिल सोले, प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार आदी ठिकठिकाणच्या निदर्शनात सहभागी झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. हा राज्य पुरस्कृत हिंसाचार असल्याची टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन करीत शांततामय निदर्शने केली. मोगलांच्या राज्यातील परिस्थिती बंगालमध्ये पाहायला मिळत असून त्याला नव्या राज्यकर्त्यांचे समर्थन असणे लोकशाहीची हत्या असल्याचे फडणवीस म्हणाले. आता सर्व तथाकथित पुरोगामी आणि स्व:तला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार आता चूप का आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांची घरे आम्ही निधी संकलन करून बांधून देऊ, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...