आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पंचायत निवडणूक:अयोध्या, मथुरा, काशीत भाजपची हार; योगींच्या गोरखपुरातही बढत नाहीच

नवी दिल्ली/लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सपा-रालोद आघाडीची विक्रमी विजयाकडे कूच, दोघांच्या एकूण जागा ८२८

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारला विधानसभा निवडणुकीच्या १० महिन्यांआधीच मोठा झटका बसला. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांना अयोध्येत सपा व मथुरेत बसपने धूळ चारली. इतकेच नव्हे तर भाजप राजधानी लखनऊतील २५ पैकी केवळ तीनच जागा जिंकू शकला. दुसरीकडे, सपा व रालोदची आघाडी विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे. त्यांचे ८२८ जिल्हा पंचायत सदस्य मंगळवारी रात्रीपर्यंत विजयी झाले वा प्रचंड मतांनी आघाडीवर होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या आशेवरही पुन्हा पाणी फिरले. त्यांचे केवळ ७४ जिल्हा पंचायत सदस्य विजयी झाले. अनेक जिल्ह्यांची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येऊ शकली नव्हती. यामुळे निकालात बदलही शक्य आहेत. आता जिल्हा पंचायत सदस्य अध्यक्षाची निवड करतील. केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याच्या विकासासाठी मिळणारा निधी अध्यक्षाच्या माध्यमातून खर्च होतो. एक अध्यक्षाद्वारे वर्षभरात सुमारे ३० कोटी रुपये खर्च केले जातात.

अयोध्या: ४० जागांपैकी भाजपला ६

जिल्ह्याच्या ४० पंचायत जागांपैकी २४ सपाने जिंकल्या. भाजपला फक्त ६ जागा. भाजपच्या डझनभर नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे भाजपची मते विभागली.

मथुरा : काँग्रेसच्या हाती भोपळा
एकूण ३३ जागा. बसपने १३ जिंकल्या. भाजपने ८, रालोदने ८, सपने १ जिंकली. ३ जागा इतरांच्या खात्यात गेल्या. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

वाराणसी : सपाला १४, भाजपला ८
पंतप्रधानांच्या वाराणसी (काशी) या लोकसभा मतदारसंघात ४० पैकी ८ जागा भाजपच्या खात्यात गेल्या. सपाने १४, बसपने ५, अपना दल (एस) ने ३ आणि आम आदमी पक्षाने १ जागा जिंकली.

गोरखपूर : भाजप-सपा बरोबरीत
सीएम योगींच्या गोरखपूर जिल्ह्यात भाजप आणि सपाला १९-१९ जागा मिळाल्या. बसपला २ तर काँग्रेसला १ जागा मिळाली. इतरांना २७ जागा मिळाल्या.

लखनऊ : भाजप-३, काँग्रेस-०
एकूण २५ जागांपैकी भाजपला ३, सपा ८, बसप ५, काँग्रेसला शून्य व इतरांना ९ जागा. दोनदा खासदार राहिलेल्या भाजप पुरस्कृत उमेदवार रीना चौधरी पंचायत निवडणुकीत सपा उमेदवाराकडून पराभूत.

मुजफ्फरनगर : सपा-काँग्रेसला भोपळा
एकूण ४३ जागांपैकी भाजपला १३, रालोदला ३, बसपला ३, सपा-काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. हा भाग सांप्रदायिक दंगलींमुळे अत्यंत संवेदनशील आहे.

पंचायत निवडणूक
विधानसभेच्या १० महिने आधी योगी सरकारला झटका,विधानसभेत ७७% जागा जिंकल्या, पंचायतीत २४ टक्केच

भाजप- 765, सपा-750

बसप-350, काँग्रेस-74

पंचायत निवडणूक सरकारच्या बाजूनेच राहते, या वेळी मात्र उलटा ट्रेंड
1. भाजप कार्यकर्ते आपल्याच सरकारमध्ये उपेक्षितपणाचा आराेप करत आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यांत तक्रारी जास्त आहेत.
2. उमेदवारांच्या निवडीत आमदार-खासदारांचा हस्तक्षेप वाढला. लादलेले उमेदवार पक्ष कार्यकर्त्यांनी स्वीकारले नाहीत.
3. भाजपमध्येच ब्राह्मण व राजपूत समुदायाचे विविध गट तयार झाले आहेत. यामुळे पक्षाचे जास्त नुकसान झाले आहे.
4. भाजप बंडखोरांची समजूत काढण्यात पूर्वीप्रमाणे यशस्वी नाही झाली. अनेक जिल्ह्यांत बंडखोरांनी पक्षाला भगदाड पाडले.
5. अनेक जिल्ह्यांत उमेदवारांना पक्षाचीच साथ मिळाली नसल्याचे चित्र दिसले. ते शेवटपर्यंत स्वत:च्या बळावर लढताना दिसले.
6. अँटी इम्कम्बन्सी फॅक्टरही होता. मतदारांनी सपा, बसपसह अपक्षांनाही मते दिली. ३६% जागा अपक्ष+इतरांनी जिंकल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...