आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP's Emphasis On Lost Seats, Congress's Focus On Rural Gujarat, Aam Aadmi Party's Door to door Campaign

गुजरात निवडणूक:भाजपचा जोर पराभूत जागांवर, काँग्रेसचे लक्ष ग्रामीण भागावर, तर आम आदमी पार्टीचा घरोघरी प्रचार

अहमदाबाद/नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांची ताकद पणाला, मतदारांत मात्र शांतता - Divya Marathi
सर्वांची ताकद पणाला, मतदारांत मात्र शांतता
  • भाजपमधून आणखी १२ बंडखोरांचे निलंबन, आतापर्यंत एकूण १९ नेते

गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आले आहे. भाजप आक्रमक प्रचार मोहीम राबवत आहे. काँग्रेस गाव, विशेषत: आदिवासी क्षेत्रांत सभा घेत आहे. आम आदमी पक्षाकडून विविध भागांत रोड शोद्वारे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी भाजप, काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी १२५ पेक्षा अधिक सभा आणि रोड शो केले. भाजपने सोमवारी ९३ मतदारसंघांत सभा घेतल्या.

भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या फीडबॅक युनिटने १५ दिवसांत दिल्लीला पाठवलेल्या अहवालांत भाजपसाठी डोकुदुखी ठरणाऱ्या ५० मतदारसंघांचा उल्लेख आहे. अहवालानुसार, आम आदमी पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थींशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या याेजनांंतर्गत लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी या भागातील जनसंपर्कासाठी घरोघरी प्रचार वाढवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपने मंगळवारी १२ बंडखोर नेत्यांना निलंबित केले. यामुळे आता निलंबित केलेल्या भाजप नेत्यांची संख्या १९ झाली.

सर्वांची ताकद पणाला, मतदारांत मात्र शांतता प्रचारात सर्व पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. मात्र, लोक शांत आहेत. सभा आणि रोड शोमध्ये गेल्या काही दशकांच्या तुलनेत गर्दी जमा होत नाही. या नव्या ट्रेंडमुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ते लोकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्येक पक्ष याकडे आपल्या बाजूने लाट असल्याचे मानतो.

भाजप : मोदींच्या १०९ जागांवर २४ सभा, पैकी ४५ जागा हरले हाेते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ दिवसांपासूनच्या तुफान प्रचारात १६ जिल्ह्यांतील १०९ मतदारसंघ कव्हर करण्याची तयारी केली आहे. यादरम्यान २४ सभा होतील. २०१७ मध्ये जेथे ४५ जागा हरल्या होत्या त्या ठिकाणी भर आहे. अनुसूचित जमातींचे ९ व अनुसूचित जातींचे ९ मतदारसंघ कव्हर करतील. २०१७ च्या निवडणुकीत मोदींनी ३८ सभा घेतल्या होत्या. मतदानाआधी मोदी रोड शो आणि डोअर-टू-डोअर प्रचारही करतील.

काँग्रेस : राहुल निवडणुकीपासून लांब, गावांत छोट्या सभांवर भर या वेळी काँग्रेसची व्यूहरचना वेगळी आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत फक्त दोन सभा घेतल्या आहेत. त्यात त्यांनी आदिवासी कार्ड खेळले. जाणकारांचे म्हणणे आहे, पक्षाला गुजरातची लढाई ‘मोदी विरुद्ध राहुल होऊ द्यायची नाही. काँग्रेसने ग्रामीण भाग आणि आदिवासी भागात जोर लावला आहे. छोट्या सभा आणि डोअर-टू-डोअर भेटींद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

आप : रोड शो आणि डोअर-टू-डोअर मोहीम, २ नेतेच प्रचार कार्यात आम आदमी पक्षाचे लक्ष रोड शो आणि डोअर-टू-डोअर जनसंपर्क मोहिमेवर आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक डझनपेक्षा अधिक रोड शो केले आहेत.

शहा : तीन दिवसांत १० सभा, यातील ५०% जागांवर मागील वेळी पराभव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान १० मतदारसंघांत सभा घेतल्या. २०१७ मध्ये यापैकी पाच जागांवर पराभव झाला होता. अध्यक्ष जे. पी. नड्डा, सहा मुख्यमंत्री, १० पेक्षा अधिक केंद्रीय मंत्री, अर्धा डझन खासदार व स्टार प्रचारक दररोज ९० मतदारसंघांत सभा घेत आहेत.

खेडा जिल्ह्यात ६ मतदारसंघासाठी तयार केले जातेय ३० लाख किलो फरसाण नडियाद| कार्यकर्त्यांच्या नाष्ट्यासाठी एकट्या खेडा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी ३० लाख किलो फरसाण तयार केले जात आहे. त्यासाठी २० कारखान्यांत काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...