आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा 2रा दिवस:राहुल म्हणाले - भाजपची विचासरणी इंग्रजांसारखी; आसामचे CM म्हणाले - पाकमध्ये यात्रा काढा

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. पक्षाने बुधवारी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत भाजपची विचारसरणी इंग्रजांसारखी असल्याचा आरोप केला.

देशावर 3-4 कंपन्यांचे राज्य

आज एका व्यक्तीच्या हातात देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य आहे. हा व्यक्ती हे भविष्य उज्ज्वल करण्याऐवजी विरोधकांना ईडी व सीबीआयची भीती दाखवत आहे. देश पुन्हा गुलामगिरीच्या काळात जात आहे. पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी देशावर राज्य करत होती. आता हे काम 3-4 कंपन्या करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले -

राहुल यांनी अखंड भारतासाठी काम करावे -आसामचे CM

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले - काँग्रेसची यात्रा शतकातील सर्वोत्तम विनोद आहे. काँग्रेसने पाकिस्तानात यात्रा काढावी. यामुळे अखंड भारताची भावना निर्माण होईल. राहुल यांनीही हे सर्व सोडून अखंड भारतासाठी काम केले पाहिजे.

राहुल म्हणाले - आम्हाला टीव्हीवर कुणीही दाखवत नाही

राहुल गांधी यात्रेला सुरुवात करताना म्हणाले की, वृत्तवाहिन्या दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण दाखवतात. पण आम्हाला कुणीही दाखवत नाही. त्यामुळे आम्ही यात्रा काढत आहोत. राहुल यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे, के.सी.वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अशोक गहलोत, भूपेश बघेल व योगेंद्र यादव यांनीही यावेळी सभेला संबोधित केले.

राहुल यांच्या भाषणातील 5 मोठ्या गोष्टी

राहुल गांधी म्हणाले की, 'केवळ काँग्रेसच नव्हे तर देशातील लक्षावधी लोकांना भारत जोडो यात्रेची गरज भासत आहे. लाखो लोकांना वाटत आहे की, भारताला एकत्र आणण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.'

1.भारतात सर्वात मोठे आर्थिक संकट : भारत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटासह आतापर्यंतच्या सर्वात भीषण बेरोजगारीच्या संकटाचा सामना करत आहे. देशाची वाटचाल संकटाकडे होत आहे. भाजप सरकार शेतकरी, मजूर व छोटे व मध्यमवर्यीय व्यावसायिकांना सूनियोजितपणे बरबाद करत आहे, असे राहुल म्हणाले.

2. लोकांचा आवाज दाबला जात आहे : नागरिकांना एकत्र आणणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ते एकजूट होतील याची काळजी काँग्रेस घेील. हेच भारत जोडो यात्रेचे उद्दीष्ट आहे. या यात्रेचा उद्देश भारतातील जनतेला ऐकणे आहे. त्यांचा आवाज दाबला जावा अशी आमची इच्छा नाही.

3. सर्वच संस्थांवर RSS-BJPचा हल्ला : आज सर्वच प्रकारच्या संस्थांवर भाजप व संघाचा हल्ला सुरू आहे. त्यांची भारतात धर्म व भाषेच्या आधारावर फूट पाडण्याची इच्छा आहे. पण हा देश विभाजित करता येत नाही. तो नेहमीच एकजूट राहील.

4. काही उद्योगपती देश नियंत्रित करत आहेत : काही मुठभर मोठे उद्योगपती आज देश नियंत्रित करत आहेत. पंतप्रधान त्यांच्या समर्थनाशिवाय एक दिवसही सर्वाइव्ह करु शकत नाहीत. पंतप्रधान मोठ्या उद्योगपतींसाठी धोरणे आणतात. त्यांची मदत करतात. नोटाबंदी, जीएसटी, कृषी कायदे आदी सर्वकाही त्यांच्या मदतीसाठीच तयार करण्यात आले होते.

5. आज तिरंग्याचा अवमान सुरू : राष्ट्रध्वजाला सलाम करणे पुरेसे नाही. त्यामागील विचारांचा बचाव करणेही महत्त्वपूर्ण आहे. तिरंगा केवळ कापडाचा एका तुकड्यावर 3 रंग व चक्र नाही. तो त्याहून अधिक आहे. तिरंगा सहज मिळाला नाही. तो भारतीयांनी कमावला आहे. तो सर्वच धर्म व भाषांचा आहे. पण आज त्याचा सर्वत्र अवमान सुरू आहे.

सोनियांचा संदेश - यात्रेमुळे होईल संघटनेचा कायाकल्प होईल

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या संदेशात म्हणाल्या की, भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी एक ऐतिहासिक संधी आहे. हा परिवर्तनाचा क्षण आहे. यातून आपल्या संघटनेचा कायाकल्प होईल. मी दररोज विचाराने व मनाने यात्रेत सहभागी असेल. वैद्यकीय कारणांमुळे सध्या मी तिथे उपस्थित नाही.

काँग्रेसची लोकसभेच्या 372 जागांवर नजर

भारत जोडो यात्रा तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा व पंजाब मार्गे केंद्रशासित जम्मू काश्मीरपर्यंत जाईल. राहुल यांची ही यात्रा जवळपास 3570 किमीची आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची लोकसभेच्या 372 जागांवर नजर आहे.

बातम्या आणखी आहेत...