आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबादचे भाग्यनगर असे नामांतर करण्याचे सूतोवाच करणाऱ्या भाजपला तेथील मनपा निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही. मात्र पक्षाने ४ जागांवरून ४८ जागा जिंकण्यापर्यंतची मोठी मजल मारली आहे. सर्वात मोठा पक्ष तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) ५५ जागा व असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ४४ जागा जिंकल्या. भाजपने आपल्या जागांत १२ पटींनी वाढ केली आहे. मनपा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व इतर केंद्रीय मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. दरम्यान, यूपीतील विधान परिषद निवडणुकीत भाजपने ६ पैकी ३ जागा जिंकल्या. मात्र वाराणसीत समाजवादी पार्टीची सरशी झाली.
यूपी : वाराणसी, गोरखपुरात भाजपला पराभवाचा साधा अंदाजही घेता आला नाही
यूपीत विधान परिषदेच्या ६ शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत भाजपने ३ जागा जिंकल्या आहेत. प्रथमच भाजपचे शिक्षक आमदार विधान परिषदेत जात आहेत. भाजप उमेदवारांनी मीरत, बरेली-मुरादाबाद आणि लखनऊ शिक्षक मतदारसंघांत विजय मिळवला. आग्रा व गोरखपूर-फैजाबादमध्ये अपक्ष तर वाराणसीत समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची सरशी झाली. येथील जागांचा अंदाज लावण्यात भाजपला सपशेल अपयश आले.
हैदराबाद : मनपात येतात पाच लोकसभा आणि २४ विधानसभा मतदारसंघ
ग्रेटर हैदराबाद मनपा (जीएचएमसी) देशातील सर्वात मोठ्या मनपांपैकी एक आहे. त्यात ४ जिल्हे आहेत. त्यात तेलंगणचे ४ लोकसभा व २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१८ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस येथे मतटक्क्यात दुसऱ्या स्थानी असली तरी त्याचे विजयात रूपांतर होऊ शकले नव्हते. ६ महिन्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक लाभ झाला होता. राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसल्याचा फॅक्टर भाजपसाठी फायदेशीर ठरत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.