आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP's Mega Outreach Plan । Vaccination In India । Mega Event After 100 Crore Vaccination Phase

भाजपचे मिशन इलेक्शन:विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे 'मेगा आउटरीच प्लान',100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाल्यानंतर करणार 'मेगा इव्हेंट'

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. ही एक मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. देशभरात कोरोना लसीकरण वेगाने सूरू असून, 96.75 कोटी जनतेने कोरोनाची लस घेतली आहे. पुढील आठवड्यात हा आकडा वाढून 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो. कोरोना या भयावह महामारीत आम्ही मोठी कामगिरी केली असे जगाला दाखवण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.

NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, 'मेगा आउटरीच प्लान' अंतर्गत भाजपने पार्टीतील मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना आणि कार्यकर्त्यांना कोरोना लसीकरण कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभागी होण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे हा मेगा आउटरीच कार्यक्रम भाजपने त्याच राज्यात सुरु केले, जिथे पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबचा समावेश आहे.

दसऱ्या नंतर लसीकरणाला वेग आणण्यासाठी योजना
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 100 कोटी लसीकरणाचा आकडा येत्या सोमवार किंवा मंगळवार पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. नवरात्र आणि दुर्गापूजा दरम्यान लसीकरणाचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोदी सरकार लसीकरणाचा वेग येण्यासाठी योजना आखत आहे. त्यामुळे लवकरच 100 कोटींच्या टप्प्या पार पडणार आहे.

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सन्मान करणार
आउटरीच कार्यक्रमांतर्गत भाजप नेते, मंत्री आणि खासदार देशातील विविध भागात जाऊऩ कोरोना लसीकरण केंद्रावर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सन्मान करणार आहे. सोबतच केंद्र सरकारच्या दुसऱ्या कल्याणकारी योजनेची माहिती देखील दिली जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार यांना कार्यक्रमांच्या आयोजनाची माहिती देण्यास पक्षाने सांगितले आहे.

2 ऑक्टोंबरपर्यत झाले 90 कोटी लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंगळवार मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 2 ऑक्टोंबरपर्यत देशात 90 कोटी जणांचे लसीकरण झाले आहे. मांडविया यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या ट्विट करत लिहले होते की, 'शास्त्री यांनी जय जवान - जय किसान ची घोषणा केली होती. त्यानंतर अटलजींनी त्यात जय विज्ञान जोडले होते आणि आता पंतप्रधान मोदी जय अनुसंधानची (संशोधन) घोषणा करत आहे. कोरोना लसीकरण हे देखील एक अनुसंधानच(संशोधन) आहे' असे ट्विट मांडविया यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...