आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक:भाजपचा 204 कमकुवत जागांचा शोध, राबवणार जिंकण्याचे धोरण, हैदराबादेत 28 डिसेंबर रोजी बैठक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून २०४ जागांचा शोध घेत त्या कमकुवत श्रेणीत ठेवल्या. त्या जिंकण्यासाठी २८-२९ डिसेंबरला बैठकीत हैदराबादेत धोरण निश्चित होईल. बिहारमध्ये २१-२२ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत राज्याच्या ४० लोकसभा जागांची समीक्षा होईल. इथे ४० पैकी २२ जागा सामाजिक व जातीय समीकरणाच्या हिशेबाने कमकुवत श्रेणीत ठेवल्या जात आहेत. याशिवाय दक्षिणेतील ८४ जागा कमकुवत म्हटल्या आहेत. जागांच्या ४ श्रेणी आहेत- सर्वोत्तम, चांगल्या, सुधारणायोग्य व अत्यंत खराब. डी श्रेणीची जागा म्हणजे तिथे भाजपची विजयाची शक्यता खूप कमी आहे. मात्र, या जागांवर नंबर दोनची स्थिती राहू शकते.

जातीय समीकरण आणि पीएमशी व्हर्च्युअली संवाद
पक्ष कमकुवत जागांचे जातीय व सामाजिक समीकरण तयार करत आहे. येथील प्रभावी व्यक्तीला भाजपच्या बॅनर-पोस्टरवर पीएम मोदी व भाजप अध्यक्षांसह जागा दिली जाईल. अशा लोकांचा गट बनवून पीएमशी थेट ऑऑनलाइन संवाद साधला जाईल.

राज्यातील कमकुवत जागा
तामिळनाडू ३६
आंध्र २५
महाराष्ट्र २४
बंगाल २३
बिहार २२
केरळ २०
तेलंगण १२
यूपी १२
ओडिशा १२
कर्नाटक ५
राजस्थान २
छत्तीसगड २
अासाम २
झारखंड २
अरुणाचल १
हिमाचल १
उत्तराखंड १
मप्र-गोवा १-१

बातम्या आणखी आहेत...