आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने प्रचाराला वेग दिला आहे. याच क्रमाने बुधवारी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चामराजनगरमधील विजय संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. भाजप २० दिवस राज्यभर अशा यात्रा काढणार असून त्या चारही दिशांना निघतील. या यात्रा ८ हजार किमीच्या असतील. यादरम्यान ८० वर रॅली, ७४ जाहीर सभा, १५० रोड शो होतील. यात्रेद्वारे भाजपचे राज्यातील ४ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह २ मार्च रोजी नंदागढपासून, गृहमंत्री अमित शहा ३ मार्चला यात्रेची सुरुवात बसवकल्याण आणि अवाथी येथून करतील.
नड्डा म्हणाले, २७ आदिवासी संशोधन केंद्रे सुरू होणार
यात्रेचा प्रारंभ करताना भाजप अध्यक्ष नड्डा म्हणाले, सरकारने आदिवासींसाठी बजेटमध्ये १९०% वाढ केली आहे. आदिवासींचे देशाच्या विकास कामांतील योगदान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २७ आदिवासी संशोधन केंद्रे सुरू केली जातील.
काँग्रेस आणि जेडीएसनेही सुरू केली यात्रा
काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेच्या मुकाबल्यासाठी भाजप ही यात्रा काढत आहे. ३ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बसवकल्याण येथून यात्रा सुरू केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ५ मार्चला या यात्रेत पोहोचतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.