आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Black Fungus Infection Latest Update; 985 Mucormycosis Patients Found In Madhya Pradesh Rajasthan

ब्लॅक फंगसचा वाढता धोका:15 राज्यांमध्ये आतापर्यंत 9320 प्रकरणे, 235 मृत्यू; 9 राज्यांनी याला महामारी घोषित केले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक्सपर्टचा सल्ला - ब्लॅक फंगसपासून बचावासाठी डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा

कोरोना काळात म्यूकर मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस धोकादायक होत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 15 राज्यांमध्येच आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 9,320 प्रकरणे समोर आली आहेत. तर 235 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त 5000 हजार प्रकरणे एकट्या गुजरातमध्येच समोर आले आहेत. या संक्रमणामुळे काही रुग्णांचे डोळेही काढावे लागले आहेत.

या 15 राज्यांमध्ये अशी आहे स्थिती

राज्यकेसमृत्यू
गुजरात500090
महाराष्ट्र150090
राजस्थान700माहिती नाही
मध्य प्रदेश70031
हरियाणा3168
उत्तर प्रदेश3008
दिल्ली3001
बिहार1172
छत्तीसगड1011
कर्नाटक971
तेलंगणा80माहिती नाही
उत्तराखंड463
चंडीगड27माहिती नाही
पुद्दुचेरी20माहिती नाही
झारखंड16माहिती नाही

या 15 राज्यांमध्ये अशी आहे स्थिती
आतापर्यंत 9 राज्यांमध्ये ब्लॅक फंगस महामारी घोषित

ब्लॅक फंगसला हरियाणाने सर्वात पहिले महामारी घोषित केले होते. यानंतर राजस्थाननेही या संक्रमणाला महामारी अॅक्टमध्ये समाविष्ट केले आहे. नंतर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना म्हटले आहे की, ब्लॅक फंगसला पेन्डेमिक अॅक्टनुसार नोटिफाय केले जावे. यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, चंदीगड, हिमाचल प्रदेश, तेलंगाना आणि तामिळनाडूनेही ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे.

गुजरातमध्ये पहिल्यांदा 15 वर्षांच्या किशोरला ब्लॅक फंगसचे संक्रमण
अहमदाबादमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या 15 वर्षांच्या किशोरला ब्लॅक फंगसचे संक्रमण झाले आहे. त्याचे ऑपरेशन करावे लागले. 4 तास चाललेल्या ऑपरेशननंतर किशोर संक्रमण मुक्त झाला आहे. डॉ. अभिषेक बन्सल यांनी सांगितले की, राज्यात एखाद्या किशोरमध्ये म्यूकर मायकोसिसचे हे पहिले प्रकरण आहे. ऑपरेशन करुन त्याची टाळू आणि साइडचे दात काढावे लागले.

एक्सपर्टचा सल्ला - ब्लॅक फंगसपासून बचावासाठी डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा
देशात अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे केस समोर येत आहेत. खरेतर हे संक्रमण शुगरच्या रुग्णांमध्ये जास्त पाहिले जाते. याबाबत दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन यांनी शुक्रवारी अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली.

  • डॉ. गुलेरिया म्हणाले की काळ्या बुरशीचा त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांना स्टेरॉइड्स द्यावे. तसेच, स्टिरॉइड्सचा एक सौम्य आणि मध्यम डोस दिला पाहिजे. जर एखादी व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून स्टेरॉइड घेत असेल तर मधुमेहासारखी समस्या उद्भवू शकते. बुरशीजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो.
  • मेदांताचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान म्हणाले की नाकाची वेदना, घट्टपणा, गालावर सूज येणे, तोंडात बुरशीचे ठिपके, पापणीवर सूज, डोळ्यांमध्ये वेदना किंवा नजर कमी होणे किंवा चेहऱ्याच्या कोणत्याही भागावर सूज सारखे लक्ष दिसले तर तत्काळ ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. त्यांनी म्हटले की, ब्लॅक फंगसला नियंत्रणात ठेवण्याचा एकच रस्ता आहे, स्टेरॉइडचा योग्य प्रकारे वापर करा आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा.
बातम्या आणखी आहेत...