आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Black Fungus Infection Outbreak Latest Update; Mucormycosis Cases Found In Haryana Tamil Nadu Rajasthan

ब्लॅक फंगसचा वाढता धोका:​​​​​​​कोरोनामुळे निर्माण झाली अजून एक महामारी, केंद्राने सर्व राज्यांना दिला इशारा; राजस्थानसह 4 राज्यांमध्ये ब्लॅक फंगस महामारी घोषित

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान, हरियाणा, तेलंगाना आणि तामिळनाडूने या ब्लॅक फंगसला पहिलेच महामारी घोषित केले आहे.

कोरोना महामारी दरम्यान समोर आलेले ब्लॅक फंगस आता केंद्रासाठी चिंतेची बाब बनली आहे. केंद्राने सर्व राज्यांना पत्र लिहून ब्लॅक फंगससाठी अलर्ट केले आहे. केंद्राने सर्व राज्यांना महामारी अधिनियमांतर्गत हा एक नोटेबल डिजीज म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. म्हणजेच काळ्या बुरशीचे, मृत्यू, उपचार आणि औषधांच्या प्रकरणांचा आढावा राज्यांना ठेवावा लागेल.

राजस्थान, हरियाणा, तेलंगाना आणि तामिळनाडूने या ब्लॅक फंगसला पहिलेच महामारी घोषित केले आहे. दिल्लीमध्येही या रुग्णांच्या उपचारांसाठी वेगळे सेंटर्स बनवले जात आहेत.

ब्लॅक फंगसवर केंद्राचे 5 पॉइंट

  1. आरोग्य मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी लव्ह अग्रवाल यांनी राज्यांना म्हटले की, ब्लॅक फंगस इन्फेक्शनचे केस खूप जास्त वाढत आहेत आणि यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आमच्या समोर नवीन आव्हान आहे.
  2. अनेक राज्यांच्या कोरोना रुग्णांमध्ये म्यूकरमाइकोसिस नावाचे फंगल इन्फेक्शन समोर आले आहे. ज्या रुग्णांना स्टेरॉयड थेरेपी देण्यात आली आहे आणि ज्यांची शुगर लेव्हल अनियंत्रित आहे अशा रुग्णांमध्ये हे दिसून येत आहे.
  3. या रोगाचा उपचार अनेकांकडून करावा लागतो. यात आय सर्जन, ENT स्पेशालिस्ट, जनरल सर्जन, न्यूरो सर्जन आणि डेंटल मॅक्सिल्लो सर्जन देखील समाविष्ट आहे. त्याच्या उपचारामध्ये, एम्फ्टोथेरेसिन-B इंजेक्शन एक उपचार म्हणून वापरले जात आहे, जे अँटीफंगल औषध आहे.
  4. तुम्ही ब्लॅक फंगसला महामारी अधिनियम 1897 नुसार अधिसूचित रोग म्हणून घोषित करा. याअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य केंद्रांवर ब्लॅक फंगसचे निरीक्षण, तपासणी, उपचार आणि व्यवस्थापनावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे.
  5. ब्लॅक फंगसच्या सर्व प्रकरणांचे रिपोर्ट जिल्हा स्तराच्या चीफ मेडिकल ऑफिसर आणि इंटीग्रेटेड डिसीज सर्विलांस प्रोग्राम सर्विलान्स सिस्टममध्येही कळवले जावे.

7 राज्यांमध्ये ब्लॅक फंगसवर अलर्ट
1. राजस्थान

400 लोकांनी ब्लॅक फंगसमुळे आपली दृष्टी गमावला आहे. जयपूरमध्ये 148 लोकांना याचे संक्रमण झाले आहे. जोधपूरात 100 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 30 प्रकरणे बीकानेर आणि इतर अजमेर, कोटा आणि उदयपूरात आहेत. सरकारने महामारी घोषित केली आहे. ब्लॅक फंगस के, मृत्यू आणि औषधांचा हिशोब ठेवावा लागेल.
2. मध्यप्रदेश
भोपाळमध्ये गेल्या 27 दिवसांमध्ये ब्लॅक फंगसचे 239 रुग्ण समोर आले आहेत. 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 174 रुग्णालयामध्ये आहेत. यामध्ये 129 जणांची सर्जरी झाली आहे. सरकार भेपाळमध्ये केवळ 68 रुग्ण असल्याचे सांगत आहे. संपूर्ण राज्यात 585 रुग्ण असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या आजाराला महामारी घोषित करण्यात आलेले नाही.

3. दिल्ली
दिल्लीमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण 300 च्या पार गेले आहेत. इंजेक्शनच्या कमतरतेमुळे ऑपरेशन करावे लागत आहेत. एम्समध्ये एका आठवड्यात 80 रुग्ण दाखल झाले आहेत. 30 जणांची अवस्था गंभीर आहे.

4. हरियाणा
संपूर्ण राज्यात ब्लॅक फंगसचे 177 रुग्ण आहेत. या संक्रमणाला महामारी घोषित करणारा हरियाणा पहिले राज्य होते. राज्याच्या औषधी विभागाने स्टेरॉयडच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

5. छत्तीसगढ़
राज्यात ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या 100 च्या जवळपास पोहोचली आहे. रुग्णालयांमध्ये 92 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त 69 रुग्ण एम्समध्ये दाखल आहेत. यामधून 19 जणांचे ऑपरेशन झाले आहे. सरकारने आतापर्यंत या आजाराला महामारी घोषित केलेले नाही.

6. तेलंगणा
तेलंगणा सरकारने ब्लॅक फंगसला महामारी अॅक्टमध्ये नोटिफाय करुन माहिती दिली आहे. तेलंगाणामध्ये ब्लॅक फंगसचे 80 प्रकरणे समोर आले आहेत.

7. तामिळनाडू
राज्यात आतापर्यंत केवळ 9 प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, दुसऱ्या राज्यांची स्थिती पाहता महामारी अॅक्टमध्ये नोटिफाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...