आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Black Fungus (Mucormycosis) Causes Update | AIIMS Director Randeep Guleria On Coronavirus COVID Situation

ब्लॅक फंगसवर AIIMS डायरेक्टरचा इशारा:स्टेरॉइडचा अयोग्य वापर थांबला नाही तर वाढू शकतात इन्फेक्शनची प्रकरणे, रुग्णालयांनी प्रोटोकॉल फॉलो करावेत

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मरामारीपूर्वी ब्लॅक फंगसची प्रकरणे कमी होती

गंभीर कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये स्टेरॉइडचा वापर झपाट्याने वाढला आहे. आता त्याचे नकारात्मक प्रकरणेही समोर येत आहेत. आतापर्यंत, देशभरात 500 पेक्षा जास्त कोरोना रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस (म्यूकर मायकोसिस) चे इंफेक्शन दिसून आले आहे. आता ऑल इंडिया मेडिकल सायंसेज (AIIMS) दिल्लीचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनीही ब्लॅक फंगसचे प्रकार वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी शनिवारी सांगितले की जास्त प्रमाणात स्टेरॉइड्स वापरल्यामुळे म्यूकर मायकोसिस (ब्लॅक फंगस) ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. डॉ. गुलेरिया यांनी रुग्णालयांना संक्रमण नियंत्रण प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. असे करण्यात अयशस्वी झाल्यास ब्लॅक फंगसने मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते.

मरामारीपूर्वी ब्लॅक फंगसची प्रकरणे कमी होती
आरोग्यासंदर्भात माहिती देताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, ब्लॅक फंगस काही प्रमाणात माती, हवा आणि खाद्यपदार्थांच्या वस्तूंवरही होऊ शकते, परंतु त्यात कोणालाही इजा करण्यासाठी पुरेसे बॅक्टेरिया नसतात. कोरोना महामारीपूर्वी, त्याची प्रकरणे फारच कमी होती, परंतु सध्या कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये ती वाढली आहे.

23 मधून 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
सध्या ब्लॅक फंगसने ग्रस्त 23 रुग्णांवर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी 20 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले की आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यात या आजाराचे 500 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ते म्हणाले की काळ्या बुरशीचा चेहरा, नाक, डोळ्याची लेअर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. हे फुफ्फुसांमध्ये देखील पसरते.

मधुमेहाच्या रुग्णांना जास्त नुकसान
AIIMS संचालक म्हणाले की कोरोना पीडित अनेक रुग्णांना मधुमेह (शुगर) देखील असतो. अशा रुग्णांना स्टेरॉइड्स दिल्यास त्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी, रुग्णाला अत्यंत विचारपूर्वक स्टेरॉइड्स देण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी हरियाणा सरकारने ब्लॅक फंगसला एक गंभीर रोग मानले आहे. तसेच ओडिशा सरकारने या आजारावर लक्ष ठेवण्यासाठी 7 सदस्यीय टीम बनवली आहे. 12 मे रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये या आजाराने 2 लोकांचा मृत्यू झाला.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस :3.26 लाख
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 3,876
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 3.52 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 2.43 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले : 2.04 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू :2.66 लाख
 • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :36.69 लाख
बातम्या आणखी आहेत...