आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Black Fungus Updates; Neither Steroid Supplements Nor Oxygen Support, Just Two Days Of Trouble, The Eye Started Coming Out

ब्लॅक फंगसचे चकीत करणारे प्रकरण:ना स्टेरॉयड घेतले ना ऑक्सिजन सपोर्ट, तरीही 2 दिवसांच्या त्रासानंतर दृष्टी गमावली आणि डोळेही आले बाहेर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजारी नसला तरीही लक्षणांवर नजर ठेवणे गरजेचे

बिहारमधील आरा जिल्ह्यात एका गावात एका 40 वर्षीय महिलेला 20 दिवसांपूर्वी ताप आला आणि ती गावातील मेडिकल स्टोरमधून औषध घेऊन बरी झाली. कोरोनाची कोणतीही तपासणी झाली नाही आणि रुग्णालयात जावे लागेल असा कोणताही त्रास झाला नाही. मात्र दोन दिवसांनंतर महिलेच्या अर्ध्या चेहऱ्यावर वेदना सुरू झाल्या. नंतर वेदना होणाऱ्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि डोळा बाहेर येऊ लागला. हे प्रकरण पाहून डॉक्टर्सही चकीत झाले. शुक्रवारी महिलेचे CT स्कॅन करण्यात आले तेव्हा ब्लॅक फंगस झाल्याची पुष्टी झाली. यानंतर महिलेला पटना AIIMS मध्ये हलवण्यात आले.

असे प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण
आराच्या कौशल्या समय हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार करणारे न्यूरो फिजिशियन डॉ. अखिलेश सिंह म्हणाले की, हे प्रकरण पाहून ते स्वतः चकीत आहेत. महिलेची अशी कोणतीच हिस्ट्री नाही, ज्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता असेल. पीडित संगीता देवींनुसार त्यांना कोणताही आजार नव्हता.

डॉ. अखिलेश यांच्यानुसार महिलेने सागंतिले की, दोन दिवसांच्या आत त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेली. पहिले दृष्टी गेली आणि नंतर डोळा बाहेर आला. डॉक्टरांनी म्हटले आहे की, महिलेची हिस्ट्री आणि या लक्षणामुळे थोडा फंगस असल्याचा संशय आला तर CT स्कॅनचा सल्ला देण्यात आला. महिलेने पटनामध्ये CT स्कॅन केले तेव्हा फंगस असल्याची पुष्टी झाली.

डॉ. अखिलेश सिंह यांनी सांगितले की, जर कोरोना संक्रमित आहात किंवा कोरोनातून बरे झाले आहात तर सावधगिरी बाळगावी लागेल. डॉक्टरांच्या संपर्कात राहावे लागेल आणि बचावासाठी उपाय करत राहावे लागतील. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. जर काही शुगर आणि ब्लड प्रेशरसह इतर आजारांमुळे त्रस्त असाल तर त्यावर विशेष लक्ष द्या. खाणे-पिणे आणि एक्सरसाइजविषय सावधगिरी बाळगा.

आजारी नसला तरीही लक्षणांवर नजर ठेवणे गरजेचे
कोरोना किंवा एखादा दुसरा आजार नसताना ब्लॅक फंगससारखे लक्षणे दिसले नाहीत याविषयी डॉक्टर्स म्हणतात की, कोरोना झाल्यावर कधी-कधी लक्षण दिसत नाहीत. अशा रुग्णांना धोका असतो. यामुळे जर आता एखादे लक्षण समोर आले तर पहिले डॉक्टरांशी संपर्क साधा. सुरुवातीच्या काळात आजाराची पुष्टी झाल्यास उपचार करणे सोपे होते.

बातम्या आणखी आहेत...