आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज रोडवर सोमवारी सकाळी सहा वाजता पुन्हा स्फोट झाला. तर अवघ्या 32 तासांमध्ये ही स्फोटाची दुसरी घटना आहे. सकाळची वेळ असल्याने या मार्गावर कोणीही नसल्याने जीवीतहानी टळली. शनिवारी रात्री उशिरा ज्या ठिकाणी स्फोट झाला होता. त्याच ठिकाणी ही घटना घडली. दुसरीकडे पहिल्यांदा झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यात पोलिस गुंतले असतांना आणखी दुसरा स्फोट झाल्याने अमृतसर हादरले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सकाळी स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्याच्यासोबत डिटेक्टिव्ह डीसीपी आणि एसीपी गुरिंदरपाल सिंग नागरा हे देखील उपस्थित होते.
फॉरेन्सिक व बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी
घटनेनंतर अमृतसर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आजूबाजूचा परिसर शोधला जात आहे. सीवरेज लाइन आणि गटर्सचीही तपासणी केली जात आहे.
स्फोटाशी संबंधित फोटो
शनिवारी झालेल्या स्फोटात 6 भाविक जखमी झाले
यापूर्वी शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला होता. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्याने 5 ते 6 भाविक जखमी झाले. डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावरून 3-4 संशयास्पद तुकडे सापडले आहेत. जे तपासासाठी पाठवण्यात आले आहे.
रेस्टॉरंटमधील चिमणीचा स्फोट समजत होती पोलिस
पोलिसांनी याआधी जवळच्या रेस्टॉरंटमधील चिमणीचा स्फोट हा अपघाताचे कारण असल्याचे सांगितले होते, मात्र सकाळी तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांचे तथ्य पालटले. डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था परमिंदर सिंग भंडाल यांनी सांगितले की, चिमणी स्फोटामुळे ही घटना घडली नाही. काही संशयास्पद वस्तू सापडल्या, ज्या फॉरेन्सिक विभागाच्या पथकांनी ताब्यात घेतल्या आहेत.
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
शनिवारी रात्री झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना एकच सीसीटीव्ही सापडला, तोही दुरून. ज्यावरून हे स्पष्ट होते की हा चिमणी स्फोट नसून जमिनीवर झालेला स्फोट आहे आणि त्यातून आगही बाहेर आली आहे.
हे ही वाचा
स्फोट:सुवर्ण मंदिराजवळीस हेरिटेज स्ट्रीटमध्ये स्फोट, काचा फुटल्याने 5 भाविक जखमी, पोलिस म्हणाले- दहशतवादी हल्ला नव्हे अपघात
पंजाबमधील अमृतसर येथील हेरिटेज स्ट्रीटवर शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे पाच ते सहा भाविक जखमी झाले. पोलिस तपासात हा अपघात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, स्फोटाचे सीसीटीव्ही समोर आले असून, त्यात स्फोट, ठिणग्या आणि धूर स्पष्टपणे दिसत आहे. सध्या या प्रकरणाची पोलिस टीम तपास करत आहे.- वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.