आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदऱ्याच्या नायट्रेट फॅक्ट्रीत ब्लास्ट:प्लांटच्या 3 बॉयलर्समध्ये सलग 8 स्फोट, 15 जखमी, 10 किमीपर्यंत ऐकले गेले आवाज

वडोदराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील नंदेसरी येथील दीपक नायट्रेट नामक एका कंपनीत गुरुवारी दुपारी सलग 8 स्फोट झाले. त्यात 15 जण जखमी झाले. सध्या संपूर्ण कंपनीला भीषण आग लागली असून, अग्निशमन विभागाचे कर्मचारी तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुर्घटनेमुळे वडोदरा हायवे बंद करण्यात आला आहे. स्थानिकांनी या स्फोटांचा आवाज 10 किमीपर्यंत ऐकावयास आल्याचे सांगितले आहे.

बॉयलरमध्ये झाला होता स्फोट

फायर ब्रिगेडच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट एका बॉयलरमध्ये झाला. त्यानंतर लागलेली आग संपूर्ण कारखान्यात पसरली. या आगीमुळे अन्य 2 बॉयलर्सचाही स्फोट झाला. स्थानिकांनी या ठिकाणी तब्बल 8 स्फोट झाल्याचा दावा केला आहे.

फायर ब्रिगेडच्या 15 गाड्या तैनात

कारखान्याला लागलेली आग एवढी भीषण आहे की, फायर ब्रिगेडच्या तब्बल 15 गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्यस्थितीत फॅक्ट्रीच्या बाहेरील भागातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पण, प्लांटच्या आतील भागात अद्यापही आग धगधगत आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ असल्यामुळे भीषण आग लागली.

सयाजी रुग्णालयाबाहेर स्ट्रेचर तयार ठेवण्यात आलेत.
सयाजी रुग्णालयाबाहेर स्ट्रेचर तयार ठेवण्यात आलेत.
बातम्या आणखी आहेत...