आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर भागात तृणमूल काँग्रेस (TMC) बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी शनिवारी भूपतीनगरमध्ये ज्या ठिकाणी लोकांना संबोधित करणार होते, तेथून 1.5 किमी अंतरावर असलेल्या कोंटाई नगरमध्ये हा स्फोट झाला. बॉम्बचा स्फोट एवढा भीषण होता की कौलारू छत असलेले मातीचे घर उद्ध्वस्त झाले.
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की, जे लोक मरण पावले ते सर्व टीएमसी कार्यकर्ते होते. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. घरावर कोणीतरी बॉम्ब टाकला असावा, अशी शक्यताही पोलीस तपासत आहेत. घरातच ठेवलेल्या क्रुड बॉम्बचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भाजपने टीएमसीला जबाबदार धरले
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी या स्फोटासाठी टीएमसीला जबाबदार धरले आहे. जिथे जिथे स्फोट होतो तिथे टीएमसीचे नेते सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्तेत राहता यासाठी सर्व समाजकंटकांना या पक्षात स्थान मिळाले आहे. यात आश्चर्यकारक काही नाही.
दुसरीकडे, बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी या स्फोटाबाबत सांगितले की, टीएमसी नेते त्यांच्या घरी क्रूड बॉम्ब बनवत होते, त्याचवेळी हा स्फोट झाला. त्यांचाही अपघातात मृत्यू झाला. टीएमसी पंचायत निवडणुकीपूर्वी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.