आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडमधील पूर्व सिंहभूम येथील टाटा स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये अचानक आग लागली. शनिवारी सकाळी 10.20 च्या सुमारास मोठा स्फोट झाला, त्यामुळे प्लांटला आग लागली. कंपनीच्या कोक प्लांटमधील बॅटरी क्रमांक 6 मध्ये हा अपघात झाला. त्यातून गॅस गळती होऊ लागली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन कंत्राटी कर्मचारी जखमी झाले आहेत.
हा स्फोट इतका जोरदार होता की आरएमएम, सिंटर प्लांट वन आणि टू मध्ये गोंधळ माजला. सर्व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. अख्ख्या प्लांटमध्ये आग लागली होती.
जखमी कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्यावर टाटा मुख्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना प्लांटमधून हलवण्यात आले आहे. गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या प्लांटमध्ये पुन्हा उत्पादन सुरू व्हावे, यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 मधील बिघाडाचा परिणाम दुसऱ्या बॅटरीवर झाला.
शहरापर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज
गोल्मुरी, बर्मामाइन्स आणि बरिदिहसह साक्ची, काशीदिह, अॅग्रिको या भागात कंपनीच्या परिसरातील स्फोटाचा आवाज ऐकू आला. काही काळ शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. कंपनीत स्फोट झाल्यानंतर साक्ची आणि बर्मामाइन्स परिसरात लोक जमा झाले. तीन वर्षांपूर्वीदेखील टाटा स्टीलच्या एच ब्लास्ट फर्नेसमध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग लागली होती. स्फोटामुळे आग आणि धुराचे लोट आकाशात पसरले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.