आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीत चकित करणारा रिसर्च:AB, B ब्लडग्रुप आणि मांसाहारी लोकांना कोरोनापासून जास्त सांभाळून राहण्याची आवश्यकता, O ब्लडग्रुपवर कमी प्रभाव

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) ने एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला असून त्यात महामारीसंबंधी काही चकित करणारे तथ्य समोर आले आहेत. या संशोधनानुसार AB आणि B रक्तगटातील लोकांना कोविड-19 पेक्षा अधिक सांभाळून राहण्याची आवश्यक आहे. O रक्तगटाच्या लोकांवर या आजाराचा सर्वात कमीत परिणाम झाला आहे. या रक्तगटातील बहुतेक रूग्ण एकतर असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा यांच्यामध्ये सौम्य लक्षणे दसून येतात.

हा अहवाल सीरो पॉझिटिव्ह सर्व्हेच्या आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. यात देशातील 10000 लोकांचा डेटा घेतला गेला असून 140 डॉक्टरांच्या टीमने त्याचे विश्लेषण केले आहे. अहवालात म्हटले आहे की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांना कोरोनाव्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे.

सर्व्हेवर 3 एक्स्पर्ट कमेंट

  1. या सर्व्हेविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आग्रा येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ. अशोक शर्मा म्हणाले की, सर्वकाही एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेवर (जेनेटिक स्ट्रक्चर) अवलंबून असते. उदाहरणार्थ, थॅलेसीमियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला क्वचितच मलेरिया होतो. अशीही अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबात संसर्ग झाला परंतु कुटुंबातील एकच व्यक्ती यापासून बचावला. याचे कारण जेनेटिक स्ट्रक्चर आहे.
  2. डॉ. शर्मा सांगतात की, कदाचित O रक्तगटाची रोगप्रतिकारकशक्ती या विषाणूविरूद्ध AB आणि B ब्लडग्रुपपेक्षा जास्त मजबूत असेल. परंतु या संशोधनावर सध्या अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या संशोधनाचा अर्थ असाही नाही की O रक्तगट असलेल्या लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे थांबवावे. ते या विषाणूपासून पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
  3. ज्येष्ठ चिकित्सक डॉ. एस.के. कालरा म्हणाले की, हा केवळ सॅम्पल सर्व्हे आहे. तज्ञांनी रिव्हीव्यू केलेले हे रिसर्च पेपर नाहीत. यामध्ये वेगवेगळ्या रक्तगटांचे संसर्ग दर वेगवेगळे का आहेत हे वैज्ञानिक आधारावर स्पष्ट झाले नाही. सध्या O रक्तगटास जास्त रोगप्रतिकारशक्तीशी जोडणे घाई ठरेल.
बातम्या आणखी आहेत...