आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरीचा गोल्डन बीच, अंदमान-निकोबारच्या हॅवलॉकमधील राधानगर बीच, गोव्याचा मीरामार बीच, द्वारकेच्या शिवराजपूरसह भारतातील ८ बीचेसना (समुद्रकिनाऱ्याचे स्थळ) ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय संस्था फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई)ने रविवारी याची घोषणा केली आहे.
पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घोषणेचे स्वागत करून ही भारतासाठी अभिमानस्पद बाब असल्याचे म्हटले. ते म्हणाले, यूएनईपी, आयसीयूएन, यूएनडब्ल्यूटीओ व एफईई यासारख्या सदस्य असलेल्या ज्युरीने भारतातील सर्व ८ प्रस्ताव स्वीकारले अाहेत. ज्युरीने समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण नियंत्रणाच्या बेस्ट प्रॅक्टिसेससाठी भारताची तिसऱ्या पुरस्कारासाठीही निवड केली आहे. येत्या ५ वर्षांत भारताचे उद्दिष्ट ५० बीचसाठी ब्ल्यू फ्लॅग मिळवण्याचे आहे. ब्ल्यू फ्लॅग पदक सर्वात स्वच्छ, सुंदर व पर्यावरणास पोषक अशा सुविधा असलेल्या समुद्रकिनाऱ्यांना दिले जाते. जानेवारी २०१८ मध्ये ओडिशातील कोणार्कच्या चंद्रभागा बीचला देण्यात आला होता. हा टॅग एक वर्षासाठी असतो. यानंतर पर्यावरण मंत्रालयाच्या सायकॉम सोसायटीने अन्य १२ बीचची निवड करून विकास कामास सुरुवात केली होती.
तथापि, कोपेनहेगन (डेन्मार्क) येथील संस्था एफईई संस्थेकडे द्वारकेतील शिवराजपूर, दमण-दीवचे घोघला, कर्नाटकातील कसरकोडव पट्टब्रिद्री, केरळचे कप्पड, विशाखापट्टणमचे ऋषिकोंडा, पुरी येथील गोल्डन व अंदमानच्या राधानगर या बीचची नावे पाठवण्यात आली होती. पर्यावरण व्यवस्थापन व संरक्षण, सुरक्षा आणि सुविधासंबंधी सुमारे ३३ स्वैच्छिक व अनिवार्य मानके पूर्ण केल्यानंतर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळते.
समुद्राच्या भरती येणाऱ्या रेषेपासून दहा मीटरनंतर समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता व स्नानासाठी पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा व बचावाच्या उपाययोजना, सुरक्षा गार्ड तेथे नियुक्त करणे, बीचवर टॉयलेटची सुविधा असणे, पिण्याचे पाणी, येण्या़-जाण्यासाठी रस्ते, माहितीफलक व पर्यावरणाच्या अभ्यासासाठी सुविधांचा या मानकांत समावेश आहे. देशातील या आठ बीचेसना ब्ल्यू फ्लॅग टॅग मिळाल्याने येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होण्याची शक्यता असून पर्यटनवाढीला चालनाही मिळेल.
५० देशांत साडेचार हजार बीच
वर्ष १९८७ ते २००० पर्यंत हे प्रमाणपत्र केवळ युरोपीय किनाऱ्यांना देण्यात आले होते. २००१मध्ये प्रथमच दक्षिणी अाफ्रिका व २०१८ मध्येे प्रथमच आशियातील किनाऱ्यास हा फ्लॅग देण्यात आला. जगातील ५० देशांत साडेचार हजार समुद्रकिनाऱ्यांना हा टॅग मिळालेला आहे. ५६६ किनाऱ्यांसाठी ब्ल्यू फ्लॅग टॅगसह स्पेन पहिल्या क्रमांकावर, ५१५ बीचसह ग्रीस दुसऱ्या तर ३९५ बीचेसह फ्रान्स तिसऱ्या स्थानावर आहे. आशियाई देशांत भारताशिवाय जपान, दक्षिण कोरिया व यूएईच्या समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मिळालेला आहे. परंतु एकाच वेळी ८ ब्ल्यू फ्लॅग फक्त भारतास मिळालेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.