आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bogus GST Currency Scam; 25 Arrested In Nationwide Operation, Gang Leader Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:बोगस जीएसटी चलन घोटाळा; देशव्यापी मोहिमेत 25 अटकेत, टोळीचा म्होरक्याही जेरबंद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसह 28 शहरांत मोहीम

वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटीचे बनावट चलन फाडले जात असल्याच्या तक्रारींनंतर अशा टाेळ्यांविरुद्ध देशव्यापी अभियान राबवले जात आहे. जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागामार्फत हे अभियान राबवले जात असून गेल्या चार दिवसांत १,१८० संस्थांविरुद्ध अशी बनावट चलने तसेच जीएसटी चोरीची ३५० प्रकरणे समोर आली आहेत. या कारवाईत २५ जणांना अटक करण्यात आली असून यात एका टोळीच्या म्होरक्यासह या क्षेत्रातील दोन व्यावसायिकांचा समावेश आहे.

सूत्रांनुसार, मुंबईच्या डीजीजीआयने अशा बनावट चलनांच्या माध्यमातून ५२० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी महाराष्ट्रात आमदार रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टे यास अटक केली होती. यासोबत सुनील हायटेकचे महासंचालक विजेंद्र राका यांनाही अटक झाली.

दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसह 28 शहरांत मोहीम
संचालनालयाच्या सूत्रांनुसार, या बनावट चलनाआधारे जीएसटी चोरी करणाऱ्यांविरुद्ध आतापर्यंतची ही सर्वात मोठी माेहीम असून या रॅकेटमध्ये सहभागी इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...