आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Star Sonu Sood Press Conference In Moga Sister Malvika To Contest From Moga

कुटुंबाच्या माध्यमातून सोनू सूद राजकारणात:बहीण मालविका मोगामधून निवडणूक लढवणार; पक्षाबाबत लवकर निर्णय घेणार

चंदिगढ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार सोनू सूद कुटुंबाच्या माध्यमातून राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहे. सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक लढवणार आहे. मालविका पुढील वर्षी पंजाब विधानसभेची निवडणूक मोगा विधानसभा मतदारसंघातून लढवणार आहेत. सोनू सूद यांनी रविवारी मोगा येथे एका परिषदेदरम्यान ही माहिती दिली. पक्षाबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, लवकरच त्याबाबतही निर्णय होईल, असे सोनुने यावेळी सांगितले.

राजकारणात येण्याबाबत सोनुने सांगितले की, बहिणीची निवडणूक लढवणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. यावेळी सूद यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे कौतुक केले. लवकरच अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बहिणीच्या कामाचे कौतुक
सोनू सूदने सांगितले की, बहीण मालविकाने खूप काम केले आहे. पंजाबच्या निवडणुकीत ती उतरणार आहे. मी पंजाबची सेवा करेल, अशी आशा असल्याचे तिने सांगितले. ते म्हणाले की, ती कोणत्या पक्षातून लढणार हे अद्याप ठरलेले नाही. पक्षापेक्षा विचार महत्त्वाचा असल्याचे सोनुने सांगितले. वेळ आल्यावर पक्षाचे नावही जाहीर करू, असे सोनू सूदने यावेळी सांगितले.

कोणत्या पक्षात जाणार यावर सस्पेन्स कायम
यापूर्वी सोनू सूद आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. पण, दोन दिवसांपूर्वी अचानक चंदीगडमध्ये सोनू सूदने सीएम चरणजीत चन्नी यांची गुपचूप भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याबाबत विचारले असता सोनुने अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. मात्र, राजकारणाचा मार्ग स्वत:साठी खुला असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...