आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bomb Blast In Lakhisarai, 7 Injured Including 3 Children, Latest News And Update

बिहारमध्ये बॉम्बस्फोट, 3 मुलांसह 7 गंभीर:लखीसरायमध्ये चक्क बॉम्बसोबत खेळत होती छोटी मुले, लागोपाठ झाले 3 स्फोट, 10 मीटरपर्यंत हादरली धरणी

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या लखीसरायमध्ये सोमवारी बॉम्बस्फोट झाले. त्यात 3 मुलांसह 7 जण गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही लहान मुले बॉम्बसोबत खेळत होती. तेव्हा पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर काही क्षणांतच आणखी 2 स्फोट झाले. त्यात 7 जण जायबंदी झाले. जखमींत एका मुलीसह 3 मुले, 2 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

स्फोटानंतर घटनास्थळी अफरातफरी माजली
स्फोटानंतर घटनास्थळी अफरातफरी माजली

स्फोटानंतर जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी सोनू कुमार नामक बालक व सुंदरी देवी नामक एका महिलेची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लखीसरायच्या पिपरीया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक व SDPO आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले.

पोलिस अधीक्षक म्हणाले -बॉम्ब गावठी होते

एसपी सुशील कुमार यांच्या माहितीनुसार, वलीपूर गावातील शंकर रजक यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात 3 बॉम्ब एका थैलीत विटांच्या ढिगाऱ्याखाली दडवून ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास ही थैली लहान मुलांच्या हाती लागली. त्यांनी कुतूहलापोटी बॉम्ब बाहेर काढले असता त्यांचा अचानक स्फोट झाला. पोलिस आता हे बॉम्ब कुणी व का लपवून ठेवले? याचा तपास करत आहेत. या प्रकरणी काही संशयितांचीही चौकशी सुरू आहे.

जखमी महिलेला उपचारासाठी घेऊन जाताना पोलिस
जखमी महिलेला उपचारासाठी घेऊन जाताना पोलिस
बातम्या आणखी आहेत...