आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीमध्ये इस्राइलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला आहे. दुतावासाच्या इमारतीपासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण, चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या स्फोटाचा तपास सुरू केला आहे. आज हा ब्लॉस्ट झाल्यामुळे चिंता वाढली आहे, कारण आजच भारत-इस्राइलच्या मैत्रीचा 29वा वर्धापन दिवस आहे.
सूत्रांनी सांगितले की, जिंदल हाउसजवळ एका फ्लॉवर पॉटमध्ये इम्प्रोवाइज्ड डिवाइस (IED) सापडला आहे. याला चालत्या गाडीतून तिथे टाकल्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 'इस्राइलच्या दुतावासाजवळ एक लो इंटेंसिटी ब्लास्ट झाला आहे. सध्या या स्फोटाच्या कारणांचा शोध सुरू आहे. सध्या घटनास्थळी गुप्तचर विभाग आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी दाखल झाले आहे. या परिसराला सध्या सील करण्यात आले आहे.
Today we celebrate 29 years of India-Israel diplomatic relations. 🇮🇳🤝🇮🇱
— Israel in India (@IsraelinIndia) January 29, 2021
As we wish our #GrowingPartnership a Happy Birthday, let's take a look back at the key moments from last year which made our relationship stronger than ever🤝. pic.twitter.com/1qDc8MzgJv
स्फोटाचा तपास NIA कडे सोपवला
दिल्लीतील अती सुरक्षित परिसरात झालेल्या ब्लस्टचा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे. तर, दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागदेखील घटनास्थळी दाखल झाला आहे.
स्फोटापासून 1.7 किमी अंतरावर होते VVIP
लुटियंस झोनमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राइलच्या दुतावासाजवळ जिथे हा स्फोट झाला, तेथून विजय चौक फक्त 1.7 किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौकात बीटिंग रिट्रीट चालू होती, त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक VVIP उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.