आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. उत्तर 24 परगणामधील जगदलमध्ये बुधवारी रात्री उशिरा क्रूड बॉम्ब हल्ला करण्यात आला. हा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणापासून भाजपा खासदार अर्जुन सिंह यांचे घर जवळच आहे. या हल्ल्याची तक्रार भाजप निवडणूक आयोगाकडे करणार आहे.
या प्रकरणात भाजपचे खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, सुमारे 15 ठिकाणी बॉम्ब फेकले गेले आणि पोलिसांनी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले आहेत. यासाठी त्यांनी तृणमूल कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे. दरम्यान, या हल्ल्यात एका मुलासह 3 जण जखमी झाल्याचे एसीपी एपी चौधरी यांनी सांगितले.
पोलिस कारवाई करत नाही : भाजप
भाजप खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, त्यांचे कार्यालय 'मजदूर भवन' वर संध्याकाळी बॉम्ब फेकण्यात आले. यानंतर त्यांच्या वाहनाला निशाणा बनवून बॉम्ब फेकण्यात आले.
खासदारांनी म्हटले की, माझ्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्यानंतर मी रात्री घरी परतलो तेव्हा बंगाल पोलिसांच्या उपस्थितीत माझ्या वाहनांना निशाणा बनवून बॉम्ब फेकण्यात आले. परिसरात कायदा व्यवस्था कोलमडली आहे. प्रश्नासन कुठे आहे? पोलिस काहीच का करत नाहीत?
निवडणूक आयोगाला इशारा: विजयवर्गीय
भाजपचे बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि खासदार मुकुल रॉय यांनीही टीएमसीला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे आणि निवडणूक आयोगाला या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. विजयवर्गीय म्हणाले की टीएमसी हिंसाचाराने राजकारणाचे प्रतीक बनले आहे. येथे गुंड उघडपणे बॉम्ब टाकत आहेत आणि गोळ्या झाडत आहेत. निवडणूक आयोगाने हा इशारा म्हणून घ्यावा अन्यथा बंगालमध्ये शांततेत मतदान होणार नाही.
भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप
दरम्यान, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी बुधवारी पूर्व मिदनापूर येथील पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या एका समर्थकांना मारहाण केली असा आरोप त्यांनी केला. शुभेंदू यांनी टीएमसी कार्यकर्त्यांविरोधात मरीशदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप समर्थक बुद्धदेव मन्ना यांच्यावर हल्ला केला असा दावा केला आहे. कार्यकर्त्यावर हा हल्ला उत्तर कांती विधानसभा मतदारसंघात करण्यात आला आहे.
बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणूका
पश्चिम बंगालमध्ये यावेळी 8 टप्प्यात मतदान होईल. 294 जागा असणाऱ्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) ला होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.