आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने शुक्रवारी www.esampada.mohua.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर देशभरातील केंद्राच्या इमारती, भवने, मालमत्तांची माहिती आहे. या इमारती आता सर्वसामान्यांना लग्नकार्ये, इतर सोहळे, सामाजिक, धार्मिक आयोजनांसाठी किरायाने घेता येईल. या पोर्टलवर सरकारी इमारतींच्या उपलब्धतेची सद्य:स्थिती पाहता येईल. त्यांच्या बुकिंगसाठी संपूर्ण प्रक्रिया व पेमेंटची व्यवस्थाही याच करता येईल.
वेब पोर्टलसोबत मोबाइल अॅपही लाँच करताना केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, संपदा संचालनालयाच्या gpra.nic.in, eawas.nic.in, estates.gov.in, holidayhomes.nic.in वेबसाइट्स आहेत. यासोबतच m-Awas व m-Ashoka5 हे मोबाइल अॅप्स आहेत. त्या सर्वांचे आता नव्या वेबपोर्टल व त्यासंबंधित अॅपमध्ये विलीनीकरण केले आहे. आता या चार प्लॅटफॉर्म्सवर ज्या सुविधा आधी मिळत होत्या, त्या आता एकाच जागी मिळतील. यामुळे पारदर्शकता वाढेल, ई-गव्हर्नन्सला चालना मिळेल, असे हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले.
नव्या पोर्टलवर सरकारी मालमत्ता आणि सुविधा
> ४० जागी १,०९,४७४ सरकारी इमारती उपलब्ध होऊ शकतील.
> २८ जागी ४५ कार्यालय परिसर आहेत, तेथे १.२५ कोटी चौरस फूट ऑफिस स्पेस मिळू शकेल.
> ६२ जागी १,१७६ हॉलिडे होम आहेत, त्यात रूम तसेच सुइट मिळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.