आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Booking For 200 Trains Including Sachkhand Express Starts From 21 May; Reservations Required

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवाशांना दिलासा:सचखंड एक्स्प्रेससह 200 रेल्वेगाड्यांसाठी आजपासून बुकिंग सुरू; आरक्षण आवश्यक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना घरी परतण्यासाठी रेल्वेने 1 मेपासून कामगार विशेष गाड्या चालवल्या आहेत. - Divya Marathi
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना घरी परतण्यासाठी रेल्वेने 1 मेपासून कामगार विशेष गाड्या चालवल्या आहेत.
  • रेल्वेस्टेशनवर स्टॉल उघडणार, केवळ खाण्याच्या जिनसा पॅक करून नेता येतील

एक जूनपासून धावणाऱ्या २०० रेल्वेंचे गुरुवारी सकाळी १० पासून ऑनलाइन बुकिंग सुरू होईल. रेल्वेने बुधवारी १०० जोडी रेल्वेंची यादी जारी केली. यात ७३ दुतर्फा मेल-एक्स्प्रेस, ५ जोडी नॉन एसी दुरांतो आणि २२ दुतर्फा जनशताब्दी रेल्वेंचा समावेश आहे. पूर्णपणे आरक्षित या रेल्वेत एसी आणि नॉन एसी या दोन श्रेणी असतील. जनरल बोगीत बसण्यासाठीही आरक्षण आ‌वश्यक आहे. रेल्वेंचे भाडे सर्वसाधारण राहील. जनरल कोचसाठी सेकंड सीटिंग भाडे आकारले जाईल. आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारेच बुकिंग होईल. रेल्वेचे कोणतेही रिझर्व्हेशन काउंटर उघडले जाणार नाही. एजंटांनाही तिकीट बुक करता येणार नाही. रेल्वेनुसार एक मेपासून धावणाऱ्या विशेष एसी रेल्वे आणि विशेष श्रमिक रेल्वेशिवाय इतर सर्व मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वे पुढील आदेशांपर्यंत धावणार नाहीत. या २०० रेल्वेंसाठी जास्तीत जास्त ३० दिवस अगोदर तिकीट बुक करता येतील. सध्याच्या नियमानुसार आरएसी आणि वेटिंग लिस्टही बनतील. मात्र वेटिंग तिकिटावर प्रवासास परवानगी नसेल. तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ बुकिंगही होईल. स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसणाऱ्यांना प्रवासास परवानगी राहील, सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.

रेल्वेस्टेशनवर स्टॉल उघडणार

रेल्वे मंडळाने स्टेशन्सवरील स्टॉल तत्काळ उघडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, फूड प्लाझा आणि विश्रांती कक्षात बसून खाण्याची प्रवाशांना परवानगी असणार नाही. त्यांना केवळ खाण्याच्या जिनसा पॅक करून नेता येतील. रेल्वेतही पॅकेज फूडच विकले जाईल.

बातम्या आणखी आहेत...