आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Border Security Force (BSF), Border Security Force, Line Of Control (LOC), Drones To Bomb Security Establishments, Indian Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचे षडयंत्र:जम्मू सीमेजवळील आपल्या सुरक्षा तळांवर ड्रोनने हल्ला करु शकतो पाकिस्तान, बीएसएफने दिला इशारा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरएसपुरा आणि सांबा सेक्टरमधील लष्करी तळांवर पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता
  • शनिवारी पंजाबच्या तरण तारणमध्ये पाकिस्तान सीमेवर 5 घुसखोरांना केले होते ठार

पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर सीमेभोवती ड्रोनद्वारे घुसखोर बॉम्बफेक करण्याच्या तयारीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) याबाबत अलर्ट जारी केला आहे. बीएसएफचा हवाला देत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरा आणि सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेभोवती सुरक्षा तळांवर हल्ला करण्याची योजना आखत आहे.

ड्रोनद्वारे ड्रग्ज, शस्त्रे पोहचविण्याचा आयएसआयचा कट आहे
बीएसएफने इतर सुरक्षा दलाला पाकिस्तानच्या हालचालींविषयी सतर्क केले आहे. पाकिस्तानने भारतीय भागात हल्ले वाढवले ​​आहेत. दुसरीकडे, चीनने पूर्व लडाखमध्ये आक्रमक वृत्ती स्वीकारली ज्यामुळे भारतासमोर दोन मोर्च्यांवर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएसआय ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्स, शस्त्रे, दारुगोळा भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा बीएसएफनेही जारी केला आहे.

बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीरमधील नियंत्रण रेषा (एलओसी) पार करण्याच्या आपल्या योजनेत दहशतवादी यशस्वी होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानजवळीच सीमांवर हालचाली वाढल्या आहेत.

शनिवारी ठार केले होते पाच घुसखोर
शनिवारी पंजाबच्या तरण तारणमध्ये बीएसएफने पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाच घुसखोरांना ठार केले होते. संशयित हालचाली दिसल्यानंतर बीएसएफने घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फायरिंग केली. प्रत्युत्तरादाखल कारवाई करताना घुसखोरांना ठार करण्यात आले. घटनास्थळावरुन एके-47 रायफल, 4 पिस्तूल आणि 9.5 किलो हेरोइन जप्त करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...