आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगंगानगर स्थित भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. वेळ- रात्री २.३५, चोहीकडे दाट धुके आणि पारा ४-५ अंशांवर पोहोचलेला आहे. ही अशी वेळ, जेव्हा लाेक लोक घरांत रजई ओढून गाढ झाेपलेले असतात. मात्र, बीएसएफ जवानांच्या डोळ्यांतील झोप उडालेली आहे. कारण, पाकिस्तान अशा वातावरणातच आपला उद्देश साध्य करण्याच्या प्रयत्नात असतो. पाकिस्तानने सध्या राजस्थान आणि पंजाबनजीकच्या सीमेवर ९ वेळा तस्करीचा प्रयत्न केलेला आहे. मात्र, आमच्या शूर जवानांसमोर त्यांचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरला. बीएसएफ मुख्यालयाची परवानगी घेऊन भास्कर टीमने सीमा चौकीवर रात्र घालवली. जवान या चिखल-पाण्यातून जात ड्यूटी बजावतात. चिखल-पाणी असले तरी जवानांचे लक्ष पाक सीमेवर आहे.
बीएसएफचे एक गस्ती पथक तारकुंपणाजळून दीड किमी पायी गस्त घालतात. अशात जवान नाइट व्हिजन डिव्हाइसद्वारे पाकिस्तानकडे नजर ठेवतात. जलपायगुडीचे अरुण टिकरी, जालंधरचे एसआय मनजितसिंग म्हणाले, चिखलात पाय घुसला तरी पडण्याची भीती असते. मात्र, शत्रू सीमेत घुसू नये याकडे लक्ष असते.
थंडीपासून बचावासाठी जवानाकडे २ लिटर गरम पाणी
थंडीपासून बचाव करण्यासाठी बीएसएफने जवानांची आहार पद्धतीही बदलली आहे. जेवणात शाकाहारी जवानांना अद्रक, लसून, तमालपत्र, इलायची, लवंगसह उष्ण प्रवृत्तीचे मसाले टाकून हिरव्या भाज्या व डाळ दिली जाते. मांसाहार खाणाऱ्यांसाठी जेवणात भातासह नॉनव्हेज दिले जाते. यामुळे प्रतिकारशक्तीसह शरीरात ताकद कायम राहावी हा उद्देश असतो. याशिवाय गस्तीवर जाताना जवानांना दोन-दोन लिटर गरम पाणी तसेच चहा दिला जातो. हे त्यांना त्वरित तंदुरुस्त ठेवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.