आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी वस्तूंवर बहिष्कार सुरू:सीमावादामुळे चिनी वस्तंच्याू खरेदीत झाली घट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद पाहता पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार सुरू झाला आहे. लोकल सर्कलद्वारे देशातील ३१९ भागांत सर्व्हे केला. त्यात ४० हजार लोकांनी यात भाग घेतला. लोकांनी सांगितले की, चीनने तयार केलेल्या वस्तू न खरेदी करण्याचे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण सीमा वाद आणि त्यानंतर निकृष्ट दर्जा आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात चिनी अॅप्सचा वापरही बंद केला आहे. सर्व्हेत सहभागी ३ पैकी १ भारतीय अद्यापही चिनी अॅप्सचा वापर करत आहे.

या कारणांमुळे लोक चिनी वस्तू घेणे टाळताहेत, खराब सेवाही मुद्दा 58% म्हणाले,त्यांनी सीमा वादामुळे चिनी वस्तूंची खरेदी कमी केली आहे. 26% म्हणाले, आम्ही चिनी उत्पादने खरेदी करत नाहीत. 11% म्हणाले, देशात कंपन्यांची सेवा चांगली आहे.

चिनी अॅप्सचा वापर करणाऱ्या लोकांचे प्रमाणही सतत घटत आहे 59% नी सांगितले, त्यांच्या मोबाइलमध्ये एकही चिनी अॅप नाही. 29% नी सांगितले, त्यांच्याकडे एकापेक्षा जास् 04%जवळ मोबाइलमध्ये ३ ते ४ चिनी अॅप आहेत.

जून 2020 मध्ये भारताने टिकटॉकसोबत ५९ अॅप्स बॅन केले होते. सप्टेंबर 2020 मध्ये सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घातली होती, यात गेमिंग अॅप पबजीचाही समावेश होता. फेब्रुवारी 2022 मध्ये ५४ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. सरकारने सांगितले होते की, अॅप युजर्सचा डेटा चोरतात.

बातम्या आणखी आहेत...