आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Both CBSE And CISCE Are Separate Institutions; Apples Cannot Be Compared To Oranges Supreme Court; News And Live Updates

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी:सीबीएसई आणि सीआयएससीई दोन्ही वेगळ्या संस्था; सफरचंदाची तुलना संत्र्याशी केली जाऊ शकत नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान पर्यायी परीक्षा होतील : सीबीएसई

सीबीएसई आणि सीआयएससीई या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. सफरचंदाची तुलना कधी संत्र्याशी केली जाऊ शकत नाही. दोन्ही मंडळांद्वारे एकच मूल्यांकन योजना ठेवली जाण्याच्या तर्कावर सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. खंडपीठाने म्हटले की, विद्यार्थ्यांना अपेक्षेचा किरण हवा आहे, अनिश्चितता नव्हे.

तथापि, कोर्टाने असेही म्हटले की, दोन्ही मंडळांच्या गुण देण्याच्या पर्यायी योजनेला मंजुरी देण्याआधी त्यावर घेतलेल्या आक्षेपांवर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने मंगळवारीही या याचिकांवर सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वकील विकास सिंह यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, सीबीएसई आणि सीआयएससीई या दोन्ही मंडळांच्या मूल्यांकनासाठी एकसमान मापदंड असावेत.

पण सध्या दोन्हींच्या मूल्यांकनाची प्रणाली वेगवेगळी आहे. गुणांची निश्चिती मागील वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर होऊ नये. कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत आहे. त्यामुळे लेखी परीक्षा आयोजित करण्यावरही विचार केला जाऊ शकतो. सध्या सांगण्यात आलेली वैकल्पिक मूल्यांकन प्रक्रिया जटिल आहे. ती समजण्यास कठीण आहे.

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्यायी परीक्षा होतील : सीबीएसई
सीबीएसईने १२ वीच्या निकालांबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक नवे शपथपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, या वेळी १२ वीची पर्यायी परीक्षा आयोजित करणे आणि निकाल जाहीर करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यायची असेल त्यांना संधी दिली जाईल. ते त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. अशा विद्यार्थ्यांसाठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्यायी परीक्षा आयोजित केल्या जातील. निकालांबाबतच्या आक्षेपांचे निवारण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

एखादा विद्यार्थी निकालामुळे समाधानी नसेल तर तो पर्यायी लेखी परीक्षेसाठी नोंदणी करू शकतो. ती फक्त मुख्य विषयांचीच असेल, तीही परिस्थिती अनुकूल असेल तेव्हाच. तीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुणच अंतिम असतील. मूल्यांकनाच्या आधारे १२ वीचा निकाल ३१ जुलैला जाहीर केला जाईल. पर्यायी परीक्षा त्यानंतर महामारीची स्थिती पाहून घेतली जाईल. कंपार्टमेंट परीक्षाही २०१९-२० च्या मूल्यांकन धोरणानुसार होईल. कंपार्टमेंट परीक्षाही १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...