आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील सत्ताधारी भाजप आणि सत्तेत परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीबाबत मनोवैज्ञानिक युद्ध सुरू झाले आहे. तिकिटासाठी दावेदारांची वाढती संख्या आणि तिकीट न दिल्यास बंडखोरी होण्याची भीती ही दोघांचीही एकसारखी समस्या आहे. अशा स्थितीत चुरशीची लढत असणाऱ्या ५० जागांवर अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. राज्यात १० मे रोजी निवडणूक असून २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत.
काँग्रेसने १६६ जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ५८ जागांसाठी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. त्यात विद्यमान ६० आमदारांना पुन्हा मैदानात उतरवून बंडखोरी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणली आहे. ज्या जागांसाठी त्यांनी उमेदवार ठरवले आहेत त्या जागा इतर पक्षांनी जिंकल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार ह नेतेही उर्वरित जागांवर समर्थकांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत. जेडीएसने ९३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाची आज उमेदवारांबाबत बैठक : भाजपने सर्व जागांसाठी प्रत्येकी दोन उमेदवारांची यादी तयार केली आहे. पक्षााच्या म्हणण्यानुसार एखााद्याचे तिकीट कापावे लागू शकते किंवा एखााद्या उमेदवाराची जागा बदलावी लागू शकते.
सुदीपच्या चित्रपटांवर बंदीची मागणी कन्नड सुपरस्टार सुदीप यांनी भाजपचा प्रचार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुदीपचे चित्रपट, शो आणि जाहिरातींच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी जेडीएसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.