आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boundary Question Appointment Of Lawyer In Maharashtra, Capable Of Protecting Karnataka Border: Bommai

नियुक्ती:सीमाप्रश्नी महाराष्ट्रात विधिज्ञाची नियुक्ती, कर्नाटक सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम : बोम्मई

बंगळुरू8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या वादात नव्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राने कायदेशीर लढाईसाठी ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया आली आहे. बोम्मई म्हणाले, सीमावाद हा महाराष्ट्रासाठी राजकीय शस्त्र ठरला आहे. तेथील सत्तेतील प्रत्येक पक्ष राजकीय लाभासाठी हा मुद्दा उपस्थित करेल. मात्र, त्यांना आतापर्यंत यश मिळाले नाही आणि भविष्यातही मिळणार नाही. आम्ही कर्नाटक सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम आहोत.भाषा, जमीन आणि पाण्याच्या मुद्‌द्यावर आम्ही एकत्रित लढलो आहेात. राज्यांचा पुनर्रचना अधिनियम बदलण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढाईसाठी विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केल्यानंतर कर्नाटकनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...