आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया चाैथी कसाेटी गुरुवारपासून:गाेलंदाज शमीचे हाेळीनंतर भारतीय संघात पुनरागमन

अहमदाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेेटीला सुरुवात हाेणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. यादरम्यान भारतीय संघाकडून गाेलंदाज शमीला दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे. त्याला वर्कलाेडमुळे सलग तीन कसाेटीदरम्यान विश्रांती देण्यात आली हाेती. मात्र, आता ताे बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी मालिकेतील चाैथी कसाेटी खेळताना दिसणार आहे. इंदूर कसाेटीतील लाजिरवाण्या पराभवामुळे आता भारतीय संघात नव्याने काही बदल हाेण्याचे चित्र आहे. यातून शमीला संधी देण्याचा विचार केला जात आहे. शमीच्या नावे २ कसाेटीमध्ये ७ बळींची नाेंद आहे. आता संघाला त्याच्याकडून या कसाेटीतही दर्जेदार कामगिरीची माेठी आशा आहे.

सध्या भारतातील खेळपट्ट्या वादाच्या भाेवऱ्यात सापडत आहेत. यामुळेच हा धाेका टाळण्यासाठी आता गुजरात क्रिकेट असाेसिएशनने खास खबरदारी घेतली आहे. ‘आम्ही नियमितप्रमाणेच खेळपट्टी तयार करणार आहाेत.

बातम्या आणखी आहेत...